*भारतीय जनता पार्टी तालुका संपर्क कार्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी*
*करमाळा तालुका प्रतिनिधी- अतुल वारे पाटील*
भारतीय जनता पार्टी करमाळा तालुका संपर्क कार्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली. अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांच्या हस्ते करण्यात आले
यावेळी बोलताना चिवटे म्हणाले की आज जी काही समाजात महिलांना मानाचे स्थान आहे ते अहिल्यादेवी होळकर व सावित्रीबाई फुले यांनी गाजवलेल्या कर्तृत्वामुळे आहे
अहिल्याबाई होळकर या उचित न्यायदानासाठी प्रसिद्ध होत्या राणी अहिल्यादेवी यांनी भारतभरात अनेक मंदिरे व नदीघाट बांधले. महेश्वर व इंदूर या गावांना सुंदर बनवले. त्यांच्या विचारानुसार वाटचाल करून तालुक्याच्या विकास कामात कायम अग्रेसर राहू हीच त्यांना खरी आदरांजली असल्याचे मत चिवटे यांनी व्यक्त केले
यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस किरण बोकन,राज्य परिषद सदस्य बाळासाहेब कुंभार, प्रवीण बिनवडे सर, विनोद महानवर ,युवा नेते युवराज किरवे, तालुका प्रसिद्धीप्रमुख जयंत काळे पाटील,युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष ऋषिकेश फंड, हर्षद गाडे,मनोज मुसळे, ओबीसी सेल चे तालुका सरचिटणीस भैय्या गोसावी,संतोष कांबळे,ऋषी खडके आदी उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा