*केंद्र सरकारच्या सप्त वर्षपूर्ती निमित्त करमाळा तालुका भाजपाकडून पोलीस स्टेशन येथे मास्क व सॅनिटायझर वाटप*
*करमाळा तालुका प्रतिनिधी- अतुल वारे पाटील*
केंद्र सरकारच्या सप्तवर्षपूर्ती निमित्त भाजपा तालुका अध्यक्ष गणेश चिवटे यांचे नेतृत्वाखाली पत्रकार सेवा संघाचे तालुका अध्यक्ष संजय शिंदे यांच्या उपस्थितीत करमाळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे साहेब यांचेकडे सर्व पोलीस कर्मचारी वर्ग व होमगार्ड यांच्यासाठी 150 सॅनिटायझर बॉटल आणि 150 मास्कचे वाटप करण्यात आले.
यावेळी गणेश चिवटे म्हटले की या कोरोना काळात सर्व पोलिस कर्मचारी, होमगार्ड यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून जनतेच्या रक्षणासाठी अहोरात्र रस्त्यावर उतरून आपले कर्तव्य बजावले अशा कोरूना योद्ध्यांचा फुल ना फुलाची पाकळी देऊन योग्य तो सन्मान करून त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम आपण सर्वांनी सदैव केले पाहिजे अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
यावेळी जिल्हा सरचिटणीस किरण बोकन, ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष धर्मराज नाळे, माजी शहर उपाध्यक्ष मच्छिंद्र फंड, अक्षय भैय्या कुंभार ,तालुका प्रसिद्धीप्रमुख जयंत काळे पाटील, बाळा जाधव आदी उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा