Breaking

शनिवार, ५ जून, २०२१

राष्ट्रवादी काॅग्रेसच्या माढा तालुका प्रसिद्धी प्रमुख पदी सतिश काळे


राष्ट्रवादी काॅग्रेसच्या माढा तालुका प्रसिद्धी प्रमुख पदी सतिश काळे
 
टेंभुर्णी (प्रतिनिधी) :- माढा तालुका राष्ट्रवादी काॅग्रेसच्या प्रसिद्धी प्रमुख पदी सतिश नवनाथ काळे (रा. वडोली) यांची निवड करण्यात आली. या निवडीचे पत्र जिल्हा परिषद सदस्य तुकाराम उर्फ बंडुनाना ढवळे यांच्या हस्ते देण्यात आले. ही निवड राष्ट्रवादी काॅग्रेसचे माढा विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष रमेश पाटील व माढा तालुका राष्ट्रवादी काॅग्रेसचे अध्यक्ष कैलास तोडकरी यांनी पत्रकार काळे यांची परखड व निर्भिड पत्रकारीता असल्याने प्रसिध्दी प्रमुख पदी निवड जाहीर केली. 
यावेळी सतिश काळे म्हणाले की,राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षाने दिलेली जबाबदारी राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरदचंद्रजी पवार साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, संसदरत्न खा.सुप्रियाताई सुळे, माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार बबनदादा शिंदे, करमाळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजयमामा शिंदे, जिल्हा परिषद सदस्य रणजित शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे विचार तळागाळात पर्यत पोहचविणार असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. सतिश काळे हे टेंभूर्णी प्रेस क्लबचे उपाध्यक्ष असुन त्यांचा सतत राजकीय,सामाजिक कार्यात सहभाग असतो.
         या निवडी बद्दल माढा विधानसभा मतदार संघाचे आ.बबनदादा शिंदे,करमाळा माढा विधानसभा मतदार संघाचे आ. संजयमामा शिंदे,जिल्हा परिषद सदस्य रणजीत भैैैय्या शिंदे,सभापती विक्रमदादा शिंदे,माढा वेलफेअर फौडेेेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा विठ्ठल गंगा फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीचे चेअरमन धनराज दादा शिंदे, जिल्हा परिषद सदस्य तुकाराम (बंडुनाना) ढवळे, जिल्हा परिषद सदस्य शिवाजी पाटील यांनी अभिनंदन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा