*पश्चिम बंगालमधील हिंसाचाराचा करमाळा भाजपच्या वतीने निषेध*
*करमाळा तालुका प्रतिनिधी- अतुल वारे पाटील*
पश्चिम बंगालच्या तृणमूल काँग्रेसच्या वतीने जो हिंसाचार केला त्या हिंसाचारात भाजपच्या कार्यकर्त्यांवर हल्ला करून 20 जणांची हत्या झाली व गंभीर जखमी झाले, त्या विरोधात भाजपा तालुका अध्यक्ष गणेश चिवटे यांच्या नेतृत्वाखाली करमाळा नायब तहसीलदार जाधव यांच्याकडे निवेदन देण्यात आले . गणेश चिवटे यांनी निवेदनात म्हटले की पश्चिम बंगाल मधील हिंसाचार हा लोकशाहीला घातक असून या हिंसाचारास येथील तृणमूल काँग्रेस सर्वस्वी जबाबदार आहे ,या सर्व प्रकाराची सखोल चौकशी होऊन दोषींवर कडक कारवाई व्हावी.
निषेध निवेदन देताना जिल्हा सरचिटणीस किरण बोकण, तालुका सरचिटणीस सुहास घोलप, राज्य परिषद सदस्य बाळासाहेब कुंभार, उद्योग आघाडीचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब हौसिंग , युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष सचिन गायकवाड किसान मोर्चा ता, अध्यक्ष विजय नागवडे, तालुका चिटणीस आजिनाथ सुरवसे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा