Breaking

बुधवार, ५ मे, २०२१

लहुजी शक्ती सेनेचे प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भाऊ कांबळे यांचे दुखःद निधन*




*लहुजी शक्ती सेनेचे प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भाऊ कांबळे यांचे दुखःद निधन*
तुळजापूरःदि.५ मे,लहुजी शक्ती सेनेचे प्रदेशाध्यक्ष कै.सोमनाथ रामा कांबळे वय ३८ वर्ष यांचे मार्कंडेय हाँस्पीटल, सोलापूर येथे (दि.०४ )रोजी रात्री ९ - ४५ वा.दरम्यान उपचार घेत असतानां अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांच्या पश्चात आई,पत्नी,
दोन मुले,एक भावजयी,दोन पुतणे असा परिवार आहे.
सामाजिक कार्याची सुरुवात लहुजी शक्ती सेना अंतर्गत सन.२००४ पासून उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष,मराठवाडा प्रमुख,ते सध्या प्रदेशाध्यक्ष पदावर कर्यरत होते.महाराष्ट्रासह मध्यप्रदेश,
आंध्रप्रदेश, कर्णाटक आदी राज्यात व इतरही राज्यात लहुजी शक्ती सेनेचे कार्य सुरु आहे.मातंग समाजाला न्याय मिळवून देणे,अन्यायाच्या विरोधात 
आक्रमक लढा देऊन गरीब आणि असंघटीत,बहुजन समाजाला संरक्षण देण्यासाठी सतत धैर्याने लढत होते.
आजपर्यंत हजारो कुटूंबाचे रक्षण कर्ते व लाखो कार्यकर्त्यांच्या गळ्यातील ताईत बनले होते.
      प्रस्तापीताना धडकी भरेल असे मातंग समाजातील बलशाली नेतृत्व आगेकूच करत होते,हे कदाचिच नियतीला रुचले नसावे.म्हणूनच की काय अल्पशा आजाराने त्यांचा अंत झाला.कै.सोमनाथ भाऊ कांबळे यांच्या पार्थीवावर त्यांच्या जन्मगावी काटगाव ता.तुळजापूर जि.उस्मानाबाद येथे सकाळी १० -३० वा. अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.यावेळी गावातील नागरीक,लहुजी शक्ती सेनेचे असंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते,राजकीय क्षेत्रातील मित्र परिवार,सकाळपासूनच  जमले होते.त्यांच्या अशा अचानक जाण्याने त्यांच्या कुटूंबावर तसेच मातंग समाजावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

प्रतिनिधी रुपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा