पश्चिम बंगाल हिंसाचाराचा श्रीगोंद्यात भाजपच्या वतीने निषेध.
श्रीगोंदा-नितीन रोही
पश्चिम बंगाल राज्यातील भाजपा कार्यकर्ते व नेते यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ माजी मंत्री तथा आमदार बबनरावजी पाचपुते यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीगोंद्यात भाजपच्या वतीने प्रशासनास निवेदन देवुन निषेध व्यक्त केला.तसेच पश्चिम बंगाल मध्ये तॄणमुल कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून भाजपाच्या कार्यकर्त्यांवर अमानुष अत्याचार चालु आहे तो त्वरीत थांबला पाहिजे तसेच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा ही निवेदनात निषेध करण्यात आला आहे.
श्रीगोंदा पोलीस निरीक्षक श्री.रामराव ढिकले यांना निवेदन देण्यात आले यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष संदीप नागवडे,कार्याध्यक्ष राजेंद्र उकांडे, तालुका सरचिटणीस दिपक शिंदे, सरचिटणीस दिपक हिरणावळे, शहर सोशल मीडिया प्रमुख महेश क्षीरसागर सह पदाधिकारी उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा