*रांझणी भिमानगर ग्रा.पं.तीने कोरोना रुग्णासाठी पाच हजार रुपयेची मदत---- कृषी व पशु संवर्धन मा. सभापती संजय पाटील भिमानगरकर*
*************************
*सोलापूर जिल्ह्यात रांझणी भिमानगर ग्रा.पं.तीने प्रथमच घडविले माणुसकीचे दर्शन*
**************************
टेंभूर्णी (प्रतिनिधी):- माढा तालुक्यातील रांझणी भिमानगर ग्रा.पं.च्या वतीने कोरोना रुग्णासाठी पाच हजार रुपयेची १५% निधीतून मदत देवून माणुसकीचे दर्शन घडविले असल्याची माहिती माजी कृषी व पशु संवर्धन सभापती संजय पाटील भिमानगरकर यांनी पत्रकारांना दिली
असून अशी मदत करणारी सोलापूर जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत ठरली असल्याचे सांगितले.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कोरोना रुग्णावर उपचार करण्यासाठी अमाप पैसा खर्च होत आहे. खऱ्या अर्थाने आता लोकांना मदत करण्याची गरज आहे. फुल नाही फुलाची पाकळी म्हणून कोरोना ग्रस्त कुटुंबांना पाच हजार रुपयाची मदत करणे काळाची गरज आहे अशी सूचना कृषी व पशु संवर्धन माजी सभापती संजय पाटील भिमानगरकर यांनी ग्रामपंचायतीला केली होती. कोरोना रुग्णांसाठी मदत करणारी रांजणी भिमानगर ग्रामपंचायत जिल्ह्यात पहिली ठरली आहे.
रांझणी भिमानगर ग्रा.पं.च्या मासिक मिटिंग मध्ये १५% निधीतून मागासवर्गीय समाजातील व्यक्तींना व अपंग व्यक्तीला कोव्हीड-19 संसर्ग झालेला आहे. व सध्या ऑक्सिजन वर पेशंट आहे. अशा पेशेंटला ग्रा.पं.१५% निधीतून पाच हजार रुपये मदत देणेचा निर्णय घेणेत आला. सदरची सभा सरपंच सौ.सोनाली पांडुरंग माने यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
सदर सभेस ग्रा.पं.उपसरपंच सौ.दिपाली तानाजी गायकवाड, ग्रा.पं.सदस्या सौ.सुनिता संजय पाटील सौ.चंचला विजय पाटील, सौ.प्रितम अक्षय पाटील, सौ.संगिता धनंजय पाटोळे, श्री.नेताजी नामदेव चमरे, श्री.रोहित दादासो गायकवाड, डॉ.श्री.विनोद चव्हाण, श्री.पांडुरंग माने, श्री.राहुल चौगुले, ग्रामसेवक एल.एम.शेख आदि उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा