एस के नावाने परिचित.
संतोष खेतमाळीस यांचे दुःखद निधन...
श्रीगोंदा-नितीन रोही,
वार्ड क्रमांक दोनच्या माजी नगराध्यक्षा तथा नगरसेविका सुनिता खेतमाळीस यांचे पति संतोष खेतमाळीस यांची सोमवार दिनांक 3 मे 2021 रोजी दुःखद निधन झाले संतोष खेतमाळीस हे अत्यंत मनाने प्रेमळ होते.त्यांचा स्वभाव हा खूपच छान होता सतत हसतमुख प्रत्येकाला विश्वासात घेऊन काम करणारे प्रत्येकाला गाडीवर येताना जाताना नमस्कार घालणे, विचारपूस करणे,विचारपूस केल्याशिवाय पुढे जायचे नाही हा त्यांचा स्वभाव होता.आमदार बबनराव पाचपुते यांचे ते समर्थक होते. त्यांच्या जाण्याने पूर्ण शहरांमध्ये पोकळी निर्माण झाली आहे. त्यांचा अंत्यविधी शहरामधील सरस्वती नदीकाठी अमरधाम येथे करण्यात आला. मागील काही दिवसांपूर्वी त्यांच्या आई-वडिलांना देखील कोरोना ने त्यांच्यापासून दूर केले आणि आज संतोष खेतमाळीस यांचे दुःखद निधन झाले त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा