उजनी धरणाच्या पाण्यात उतरून आंदोलन करणाऱ्या 14 जणांवर गुन्हा दाखल
उजनी धरणातून इंदापूर तालुक्याला पाच टीएमसी पाणी देण्याचे प्रकरण गाजत असतानाच त्याला विरोध म्हणून उजनी धरणाच्या पाण्यामध्ये उतरून आंदोलन करणाऱ्या प्रभाकर भैया देशमुख व अतुल खूपसे यांच्यासह 14 जणांवरती टेंभुर्णी पोलीस स्टेशन येथे आपत्ती व्यवस्थापन अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत टेंभुर्णी पोलीस ठाणे कडून मिळालेली सविस्तर माहिती अशी की दिनांक १ मे रोजी सकाळी ११ ते रात्री ०६ दरम्यान उजनी गावाची शिवारातील उस्मानाबाद पाणी पुरवठा योजनेचे व एनटीपीसी पाणीपुरवठा केंद्राचे मध्ये १)प्रभाकर भैया शिवाजीराव देशमुख राहणार पाटकुल तालुका मोहोळ २)अतुल भैरवनाथ खूपसे राहणार उपळवाटे तालुका माढा ३)माऊली नागनाथ हलवर राहणार ईश्वर वठिर तालुका पंढरपूर ४)दत्ताभाऊ विठ्ठल व्यवहारे राहणार पांढरेवाडी तालुका पंढरपूर ५)विठ्ठल दत्तू मस्के राहणार शेवरे तालुका माढा ६)अण्णासाहेब वामन जाधव राहणार तांदुळवाडी तालुका माढा ७)किरण भांगे ८)बापू दादा मिटकरी राहणार तालुका मोहोळ ९)धनाजी विष्णू गडदे राहणार नंदेश्वर तालुका मंगळवेढा १०)बळीराम लक्ष्मण गायकवाड राहणार रिधोरे तालुका माढा ११)जय प्रकाश गोरे १२)औदुंबर केरू गायकवाड राहणार कव्हे रोपळे तालुका माढा १३)श्रावण प्रभाकर लवटे राहणार नंदेश्वर तालुका मंगळवेढा १४)अभिजीत पाटील. आशा सर्वांनी मिळून बेकायदा जमाव जमून जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याकडील आदेशाचा भंग करून उजनी धरणातील पाणी इंदापूरला नेण्याचा आदेश रद्द व्हावा म्हणून त्यांनी दिलेल्या आदेशाचे पालन न करता त्याचे पाण्यात जाऊन तिथे थांबून शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करून आंदोलन केले म्हणून वरील सर्व आंदोलकांवरती भा द वि १४३,१४७,१८६,१८८,२७९,२७०,२७१,२९०, महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम १३५ आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ चे कलम 51(ब) प्रमाणे टेंभुर्णी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल लोंढे हे करीत आहेत


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा