Breaking

रविवार, २ मे, २०२१

ज्येष्ठ पत्रकार प्रतापराव माने यांचे दुःख निधन*




*ज्येष्ठ पत्रकार प्रतापराव माने यांचे दुःख निधन*

वडूज : निमसोड (ता.खटाव) येथील ज्येष्ठ पत्रकार प्रतापराव परशुराम माने (वय ५८) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. तब्बल ३० वर्षे त्यांनी दैनिक ऐक्य, दैनिक मुक्तागिरी, पश्चिम महाराष्ट्र तरूण भारत,साप्ताहिक येरळा दर्शन, साप्ताहिक रयत या दैनिकांमध्ये वार्तांकनाचे काम केले. सर्वसामान्य कौटुंबिक परिस्थितीत राहूनही सर्वांशी 
मनमिळाऊ, हसतमुख असा त्यांचा स्वभाव होता. सर्वसामान्यांच्या व्यथा मांडणारे निर्भीड व ज्येष्ठ पत्रकार म्हणून त्यांची विशेष ख्याती होती. पत्रकारीतबरोबरच त्यांनी सामाजिक कार्याची आवड जोपासली होती. 
        विविध सामाजिक कार्यात त्यांचा हिरीरीचा सहभाग दिसून येत होता. महाराष्ट्र राज्य गाडी लोहार समाज संघटनेचे संघटक म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. विविध मान्यवरांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. त्यांच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त होत आहे. रक्षाविसर्जन विधी मंगळवार दि. ४ रोजी होणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा