Breaking

सोमवार, ३ मे, २०२१

भुरकवडीत पतीच्या निधनानंतर सहा दिवसात पत्नीचेही निधन*



*भुरकवडीत पतीच्या निधनानंतर सहा दिवसात पत्नीचेही निधन*
वडूज प्रतिनिधी / शरद कदम

         भुरकवडी ता. खटाव येथील रहिवासी असलेले साई तेजस ट्रेडर्सचे मालक, माजी सैनिक शिवाजीराव हरिबा कदम वय ७५ यांचे २४ एप्रिलला निधन झाले तर त्यांच्या पत्नी गोदाबाई शिवाजीराव कदम वय ७० यांचे ३० एप्रिलला सहा दिवसाच्या फरकाने शाररीक आजार व कोरोना महामारीने सातारा येथील रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले.
        कै.शिवाजीराव कदम यांनी भारतीय सैन्यदलात ३२ वर्ष सेवा बजावून पुणे येथील टेल्कोमध्ये १० वर्ष काम केले. नंतर गावी येऊन शेतीबरोबर साईतेजस ट्रेडर्स दुकान चालू केले. दरम्यान पतीच्या निधनाची बातमी पत्नी गोदाबाई कदम यांना लागताच त्यांना मोठा धक्का बसला होता. त्यांची तपासणी केली असता त्याही कोरोना बाधित निघाल्या होत्या. इतर आजार असल्याने उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. मात्र शुक्रवार ३० रोजी अखेरचा श्वास घेतला. पती - पत्नीच्या अचानक जाण्याने कदम कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. 
        त्यांच्या पश्चात दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. साई तेजस ट्रेडर्सचे संचालक नानासाहेब कदम, तेजस कदम यांचे आई - वडील तर सोसायटीचे माजी अध्यक्ष मधुकर कदम यांचे भाव -भावजय होत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा