Breaking

शुक्रवार, २३ एप्रिल, २०२१

कुर्डुवाडी विशेष बुलेटिनचा व पोलिस धाडसत्राचे जिल्हाभर पडसाद...* *कुर्डुवाडीतील लॅबपाठोपाठ जिल्ह्यातील ब-याच लॅबवाल्यांनीही गाशा गुंडाळला...?*

कुर्डुवाडी विशेष बुलेटिनचा व पोलिस धाडसत्राचे जिल्हाभर पडसाद...*
       *कुर्डुवाडीतील लॅबपाठोपाठ जिल्ह्यातील ब-याच लॅबवाल्यांनीही गाशा गुंडाळला...?*
       *✒️कुर्डुवाडी विशेष बुलेटिन✒️*
*अरुण कोरे(पत्रकार )यांजकडून...*





         *कुर्डुवाडी शहरांत "कोरोनो स्प्रेडच्या" पार्श्वभूमीवर मंगळवारी दुपारी पोलिसांच्या विशेष पथकांनी अचानकच धाडी टाकल्याने शहरांसह जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली असून त्यांचे पडसाद राज्यभर उमटल्याची चर्चा वैद्यकीय क्षेत्राचा कानोसा घेतला असता दिसून येत आहे.*
       *मंगळवारच्या पोलिसांच्या तीन विशेष पथकांनी अचानकच शहरातील समर्थ लॅब,शुभम लॅब, मुस्कान लॅब यांच्या तपासण्या बाबत गोपनीय माहितीवरून धाडसत्रांचे नियोजन केले होते.*
     *त्यानंतर पोलिस खात्याकडून कसून चौकशी चालू असून वरिष्ठ पातळीवरून त्यांची शहानिशा करण्याचें काम केले जाते आहे.*
     *कुर्डुवाडीच्या धाडी टाकलेल्या मुजोर लॅबवाल्यांनी आम्ही फार साव असल्याचा आव आणण्याचाही अयशस्वी प्रयत्न केला.मात्र वरिष्ठाच्या तंबी नंतर नाईलाजाने तपासण्या बंद केल्या. नंतर त्याचे पडसाद शहराबरोबरच संपूर्ण सोलापूर जिल्ह्यांसह राज्यभर पडल्याचे दिसून येते.*
     *जिल्ह्यातील सांगोला, मंगळवेढा,मोहोळ,माळशिरस, माढा,बार्शी, अक्कलकोट,करमाळा या तालुक्यांचा कानोसा घेतला असता अनेक जण जसं साधल तसं लुटून तपासण्या करत असल्याचे सांगितले जाते.एका तपासणीसाठी दोन ते तीन हजार रुपये अनधिकृतपणे घेतले जात होते पण त्याच्या अधिकृत पावत्या दिल्या जात नाहीत असेही अनेकांकडून सांगण्यात आले.*
    *"कोरोनो"च्या भितीत किती लुटलं याची चविष्ट चर्चा उघड उघड केली जात आहे.*
    *त्यांच्यावर कुणाचेही नियंत्रण नसल्याचे स्पष्ट झाले आहे."डाक्टर्स सांगे लॅबवाले डोले"तेरी भी चूप मेरी भी चूपचे बिंगच फुटल्याने वैद्यकीय क्षेत्र चांगलेच चव्हाट्यावर आले आहे.*
       *कुर्डुवाडीतील पोलिस धाडसत्राचा धसका जिल्ह्यांतील इतर लॅबवाल्यांनीही घेतल्याचेही दिसून येते.अनेक जणांनी कशाला उगीच झंझट नको... म्हणून चोरून मारुन वैध-अवैध, परवानग्या कुणाच्या अधिकृत- अनधिकृत याबाबतही लॅबवाले व वैद्यकीय क्षेत्रातील रॅकेट यांचं गुफ्तगू होऊन अनेकांनी बंद केल्याचे सांगितले जात आहे.*
      *त्यातच करमाळा तालुक्यात गुरुवारी लॅबवाल्यासह डॉक्टरांवरही "विशाल" धाड टाकून पोलिसांनी गुन्हा नोदवल्याने वैद्यकीय क्षेत्र चांगलेच हादरले आहे.तर अनेकांच्या सुतकी चेह-याने झोपाही उडाल्याचे दिसून येत आहे.*
      *या सर्व प्रकारात कोरोनो टेस्टच्या नावाखाली चाललेल्या गैरकारभाराबाबत जो आततायीपणे धुमाकूळ घातला आहे त्याबाबत पोलिस खात्याकडून अनेक अंगांनी कसून तपासणी केली जात आहे.*
    *पोलिस खात्याची याबाबत असलैली सावध अन् चाणाक्ष विशाल भूमिका बरेच काही सांगून जात आहे.*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा