*बुध ग्रामसमितीचाही कडक लॉक डाऊनचा निर्णय, - सरपंच राजे घाडगे*
नियमाचे उल्लंघन केल्यास कारवाई होणार.
वडूज प्रतिनिधी / शरद कदम
कोरोना संक्रमणाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे तसेच बुध मधील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या वाढू लागल्याने शनिवार दि.२४ ते शुक्रवार दि.३० अखेर कडक लॉकडाउन जाहीर करण्यात आलेले आहे .
याबाबत बुध ग्रामपंचायतीच्या सभागृहात ग्रामस्तरीय दक्षता कमिटीच्या मिटीगमध्ये कडक लॉकडाउनचा निर्णय घेण्यात आला . यावेळी सरपंच अभयसिंह राजेघाटगे , उपसरपंच मनिषा कुंभार, सदस्य शशिकांत घाटगे, विजय खराटे, योगेश ढोबरे, रेखा घार्गे , दिपाली मेळावणे, ग्रामविकास अधिकारी शशिकांत माने, तलाठी किशोर घनवट, बीट अंमलदार सचिन माने, प्राथमिक उपकेंद्राच्या पवार मॅडम, आशासेविका राणी कुंभार व ग्रामस्तरीय दक्षता कमिटीचे सदस्य उपस्थित होते.
यावेळी या कडक लॉकडाउनच्या काळात फक्त दवाखाना व मेडिकल इत्यादी चालू राहतील .इतर सर्व प्रकारच्या अत्यावश्यक सेवा पूर्णपणे बंद राहतील त्यामुळे ग्रामस्थांनी कोणत्याही कारणास्तव घरामधून बाहेर पडू नये,अनावश्यक बाहेर पडल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल आणि अत्यावश्यक सेवेतील दुकानदारांनी सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करून कोरोना संपेपर्यंत दुकान बंद करण्यात येईल, असा इशारा ग्राम दक्षता समितीने दिला आहे .


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा