Breaking

शुक्रवार, २३ एप्रिल, २०२१

*आलेगाव बु! येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकारी व कर्मचारी यांच्या संगनमताने कोरोना लसी कारण तर सर्वसामान्य नागरिकातून तीव्र संतापाची लाट*



भिमानगर प्रतिनिधी/सतिश काळे


माढा तालुक्यातील आलेगाव बु! येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांनी संगनमताने कोरोना लसीकरणाचा सावळा गोंधळ करून मर्जीतील लोकांनाच लस देण्याचा प्रताप केला जात आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाच्या वतीने वयाच्या ४५ वर्षा पासुन पुढील लोकांनी डोस घेण्यासाठी पुढे यावे असे सांगितले जात आहे. आलेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात मात्र लसीकरणासाठी १५० ते २०० लोक उपस्थित राहत असून फक्त ५० लोकांना पुरतील एवढेच लसी चे डोस उपलब्ध होत आहेत. पुरेशा प्रमाणात लसीकरणाचे डोस उपलब्ध होत नाहीत. त्यात आरोग्य अधिकारी व दवाखान्यातील सिस्टर स्टॉप कडून मर्जीतील लोकांनाच लस टोचून दिली जात आहे. लस अजून टेंभूर्णी येथून आलेली नाही. लस आल्यानंतर दिली जाईल अशी खोटी माहिती सांगून फक्त कर्मचाऱ्यांच्या जवळील लोकांनाच गुपचूप लस देण्याचे काम दवाखान्यात सुरू असल्याचे निदर्शनास आले.

सकाळी सहा वाजल्यापासून लोक नंबरला येवून थांबत आहेत, लस मात्र उशिरा आलेल्या लोकांना वशिलेबाजी करून दिली जात असल्याची तक्रार रुग्णांनी केली आहे. 
लसीकरणाच्या अनागोंदी कारभारामुळे लोकांनी जाब विचारला असता कर्मचारी वर्ग उद्धट भाषा वापरून रुग्णांना वेठीस धरत आहेत. व लसीकरण बंद करू अशी धमकी देत असल्याचे पहावयास मिळाले. 
सदर प्रकरणातील डॉक्टर, सिस्टर यांची चौकशी करून यांचे वरती कारवाई करण्यात यावी अशी मागणी लोकांनी केली आहे. वरिष्ठ अधिकारी सदर कर्मचाऱ्यांवर कारवाई करणार की पाठीशी घालणार हा येणारा काळच ठरवेल.

चौकट १
दवाखान्यातील कर्मचाऱ्यांनी नंबरचा गैरकारभार करून लसीकरण सुरू केलेमुळे लोकांनी गोंधळ घातला. यामुळे पोलिसांना पाचारण करावे लागले, पोलिसांनी मध्यस्थी करून लोकांना समजावून सांगितले नंतर लसीकरण सुरू करण्यात आले. 


चौकट २
लसी फक्त ५० डोस आमच्याकडे येत आहेत व लस घेण्यासाठी आम्हीं जी यादी करणार तीच यादी ग्राह्य धरण्यात येईल. लोकांना मान्य नसेल तर लसीकरण बंद केले जाईल कुणालाच लस दिली जाणार नाही. कुणाला आमच्या विरुद्ध तक्रार करायची असेल त्यांनी मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री यांच्या कडे फोन करून तक्रार करावी. 
           - डॉ. संतोष गायकवाड 
                 आरोग्य अधिकारी 
         प्राथमिक आरोग्य केंद्र आलेगाव बु!


चौकट ३
माझ बायपास सर्जरी झालेल आहे मी सकाळी सात वाजल्यापासून पासून लस घेण्यासाठी दवाखान्यात नंबर लावून थांबलेलो होतो. वारंवार दवाखान्यातील सिस्टर स्टॉप यांना लस घेण्यासाठी विचारले असता अजून लस आलेली नाही. लस आलेनंतर दिली जाईल असे सांगितले. आमच्या पाठीमागून आलेल्या अनेक लोकांना वशिलेबाजी करून लस दिली गेली. 
        - विकास गाडे
      प्रगतशील शेतकरी, चांदज.


चौकट ४
वशिलेबाजी करून मर्जीतील लोकांनाच लस टोचून दिली जात होती. मी विचारले असता तुमचा नंबर आज लागणार नाही तुम्हीं नंतर या असे सांगितले व माझ्या पाठीमागून आलेल्या अनेक लोकांना लस टोचून दिली. व त्यांनी नंबर अगोदर लावले आहेत असे खोटे सांगत होते. 
          - साधू खरात 
    महावितरण कर्मचारी, आढेगाव.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा