Breaking

शनिवार, २४ एप्रिल, २०२१

शासनाला कोविड सेंटर उभारणीसाठी विना मोबदला/मोफत... दोन एकर जागा देणार-शेतकरी नेते अतुल खूपसे पाटील....




शासनाला कोविड सेंटर उभारणीसाठी विना मोबदला/मोफत...
 दोन एकर जागा देणार-शेतकरी नेते अतुल खूपसे पाटील.....

श्रीगोंदा -
-नितीन रोही,

सविस्तर असे की खूपसे यांच्या मालकीची उपळवटे, तालुका-माढा येथे दोन एकर शेती आहे.करमाळा आणि माढा तालुक्यातील नागरिकांना उपचार घेण्यासाठी अकलूज किंवा बार्शी या ठिकाणी जावे लागते.तर काही रुग्णांना सोलापूर,पुणे किंवा अन्य बाहेर ठिकाणी जावे लागत आहे. ग्रामीण भागातील रुग्नांना मोठ्या शहरातील हॉस्पिटल मध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणची परिस्थिती पाहून किंवा घाबरून बरेच भीतीने दगावत आहेत. सध्या करमाळा आणि माढा तालुक्यात दारोज मोठया संख्खेत रुग्न सापडत आहेत. त्यामुळे रुग्नांची होत आहे. मात्र करमाळा आणि माढा या दोन्ही तालुक्याच्या बोर्डर वर खूपसे यांची दोन एकर जागा असून ते शासनाला कोविड सेंटर उभा करण्यासाठी विनामोबदला म्हणजे मोफत देत आहे.
  तसे त्यांनी मुख्यमंत्री,आरोग्यमंत्री, उपमुख्यमंत्री,जिल्हाधिकारी सोलापूर,तहसीलदार माढा, तहसीलदार करमाळा, गट विकास अधिकारी करमाळा,
 गट विकास अधिकारी माढा, यांना पत्र देऊन कळवले आहे. असे खुपसे यांनी संघर्ष नामाशी बोलताना सांगितले. त्यामुळे अतुल खुपसे(मा.संपर्कप्रमुख महाराष्ट्र प्रहार संघटना)या शेतकरी नेत्याचे सोलापूर जिल्ह्यासह सर्वत्र कौतुक होत आहे.

फोटो,

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा