*शिक्षकाचे गीत गायनातून कोरोना लसीकरणाचे आवाहन*
वडूज प्रतिनिधी / शरद कदम
खटाव ता.खटाव येथील चंद्रहार पाटील ग्रामीण शिक्षण संस्था खटाव येथील विज्ञान शिक्षक श्री.आर जे भोसले सर यांनी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमिवर आपल्या ' ऐका रे भावांनो, ऐका हो ताईनो ' या शब्दसुरातन सर्वांनी लसीकरणासाठी पुढे यावे असे आवाहन केले आहे.
गेल्या १ वर्षापासून कोरोनाने संपूर्ण जगाबरोबर महाराष्ट्रातही हाहाकार माजविला आहे. यातच या वर्षी कोरोनाची दुसरी लाट पसरली असून सातारा जिल्ह्यासह तालुका हादरून गेला असून प्रत्येक गावात व वाडी वस्तीवर कोरोना रुग्णसंख्या वाढतच चाललेली आहे. यामध्ये शासनाने लसीकरण करून घेण्यासाठी विविध उपाय योजले आहेत. परंतु आपली ही सामाजिक बांधिलकी समजून आपणाही आपल्या बांधवासाठी काहीतरी करू शकतो या उदात्त भावनाने आपल्या कल्पकतेतून गीत गायनातून लसीकरण करून घेणे किती फायदेशीर आहे हे पटवून दिले आहे. खटाव येथील शिक्षक श्री.भोसले सर यांनी या गीताचा व्हिडिओ घरीच तयार केला असून सोशल मिडियावरती तो पोष्ट केला आहे.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमिवरती अनेक गावामध्ये ग्रामपंचायतीच्या वाहनामधून तो व्हिडीओ ऐकविला जात आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून लसीकरण करणे, मॉस्कचा वापर करणे, सॅनिटायझरचा वापर करणे व सोशल डिस्टिंग ठेवणे हे किती महत्त्वाचे आहे हे आपल्या शब्दगीत गायनातून सुरेल आवाजात सांगण्याचा त्यांनी चांगला प्रयत्न केला आहे. या त्यांच्या समाज जनजागृती कार्याचे खटाव, वडूज, औंध व पुसेगाव परिसरातून कौतुक होत आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा