*करमाळ्यातील प्रस्थापित राजकारणी येथील पाणी प्रश्न सोडवण्यास अपयशी:नितीन झिंजाडे*
*करमाळा तालुका प्रतिनिधी- अतुल वारे पाटील*
इंदापुर तालुक्यासाठी उजनी जलाशयातून करण्यात आलेली पाण्याची तरतुद म्हणजे तेथील नेत्याची लोकांप्रती असलेली तळमळ लक्षात येते.याउलट करमाळा तालुक्यातील शेतीचा पाणी प्रश्न सोडवण्यात करमाळा तालुक्यातील सर्वच प्रस्थापित नेते अपयशी ठरले आहेत असे मत राष्ट्रवादी पदवीधर संघाचे प्रदेश सदस्य नितीनभाऊ झिंजाडे यांनी व्यक्त केले आहे.
याबाबत अधिक बोलताना ते म्हणाले की,करमाळा तालुक्यातील सर्वच नेत्यांनी सिंचन प्रश्न कायमच लोंबकळत ठेवला आहे.तालुक्यात कुकडी प्रकल्पासह अनेक मध्यम व छोटे पाणी साठवण तलाव,दहिगाव व कोळगाव उपसा सिंचन योजना,कोळगाव व उजनी सारखे मोठी धरणे असूनही आज तालुक्यातील 75%भाग जिरायत आहे.दुष्काळाचा हा कलंक नेत्याच्या आकार्यक्षमतेचे उदाहरण आहे.आहे त्या व कधीतरी सुटणाऱ्या पाण्याचे श्रेयवादाचे राजकारण करण्यात करमाळा तालुक्यातील सर्वच नेते तरबेज आहेत.मूळ पाणी प्रश्नाकडे सर्वच पाठ फिरवीत आहेत.त्यामुळे इंदापुरच्या पाणी तरतुदी वरून राजकारण बंद केले पाहिजे.आज इंदापूर तालुक्यासाठी उजनीच्या पाण्याची झालेली तरतूदीवरून सर्वच नेते थयथयाट करत आहेत हाच थयथयाट त्यांनी ते सत्तेत असताना लोकांसाठी,सिंचन योजना कार्यान्वित करण्यासाठी केला असता तर आज परिस्थितीत वेगळी असती.ही सर्व परिस्थिती पाहता आपण लवकरच राज्याचे जलसंधारणमंत्री जयंतजी पाटील यांना भेटणार असून तालुक्यातील शेतीचा पाणी प्रश्न त्यांच्या लक्षात आणून देणार आहोत असेही ते शेवटी म्हणाले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा