*उजनीचे पाणी चोरणाऱ्यांना स्वाभिमानी धडा शिकवणार - सुदर्शन शेळके*
*करमाळा तालुका प्रतिनिधी- अतुल वारे पाटील*
करमाळा तालुक्यातील ऊजनी धरणातील पाणी चोरणार्यांना स्वाभिमानी शेतकरी संघटना सोडणार नाही. शेतकऱ्यांना सोबत घेऊन तीव्र जनआंदोलन उभारण्याचा इशारा तालुकाध्यक्ष सुदर्शन शेळके यांनी दिला आहे.
याबाबत सविस्तर माहिती देताना ते म्हणाले की,उजनी मध्ये 80% क्षेत्र करमाळा तालुक्यातील गेले आहे.तरी करमाळा तालुका अजुनही कोरडाच आहे . तिकडे लक्ष देण्यास आमदार ,खासदार, पालकमंत्री ,उपमुख्यमंत्री विरोधक यांना वेळ नाही.यांना फक्त उजनी चे पाणी गोड बोलून चोरता येते.परंतु ह्या भुमीकेला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पूर्ण विरोध आहे.जर उजनीच्या पाणी चोरणारी करणारी टोळी सक्रिय असेल तर स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकऱ्यांना घेऊन सरकारला धडा शिकविण्यासाठी आपण शेतकऱ्यांना सोबत घेऊन आपण मोठे जनआंदोलन उभे करणार आहोत.
*प्रशासनाने व लोकप्रतिनिधींनी करमाळ्यात सुसज्ज कोविड सेंटरसाठी प्रयत्न करावेत- सुदर्शन शेळके*
*करमाळा तालुका प्रतिनिधी- अतुल वारे पाटील*
करमाळा तालुक्यातील कोरोनाचा प्रसार वाढत असून सर्वसामान्यांचे हाताला काम नसल्याने कोविड उपचारांसाठी पैसा शिल्लक नाही. त्यामुळे प्रशासन व तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी तालुक्यात तातडीने सुसज्ज कोव्हीड सेंटर उभारणीसाठी प्रयत्न करण्याची मागणी स्वाभिमानीचे तालुकाध्यक्ष सुदर्शन शेळके यांनी केली आहे.
यावेळी
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र गोडगे,ता.युवा अध्यक्ष अमोल घुमरे,ता.पक्षाध्यक्ष बापू फरतडे,
ता.उपाध्यक्ष तानाजी शिंदे,स्वाभिमानी नेते दीपक शिंदे,
बलभिम धगाटे व कांतीलाल शिंदे
उपस्थित होते


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा