*AJ 24 Taas News च्या दनक्याने प्रशासनाने घेतली दखल*
**************************
*कुर्डुवाडी येथील खाजगी लॅबवाल्यानी अखेर बंद केल्या तपासण्या...*
******************************
*बातमीतून खुलाशावरुन "दसहजारी" हास्यास्पद प्रकार...*
*पोलिसांची वैद्यकीय क्षेत्रातील वरिष्ठांशी संपर्क... कुणालाही क्लिनचिट दिली नाही...*
*✒️ AJ 24 Taas News कुर्डुवाडी विशेष बुलेटिन✒️*
*अरुण कोरे पत्रकार यांजकडून...*
*कुर्डुवाडी शहरांत "कोरोनो स्प्रेड"च्या पार्श्वभूमीवर मंगळवारी पोलिस खात्याच्या विशेष पथकांनी तीन खाजगी लॅबवर अचानकच टाकलेल्या धाडसत्रानंतर तीनही लॅबवाल्यांनी कोरोनोच्या तपासण्या बंद केल्या आहेत.*
*मंगळवारी दुपारी पोलिसांच्या विशेष तीन पथकांनी समर्थ लॅब,माढा रोड,शुभम लॅब पोष्टाजवळ, मुस्कान लॅब,साई काॅलनी या तीन लॅबवर अचानकच धाडी टाकल्याने तेथील गैरप्रकार चव्हाट्यावर आला होता.*
*त्यानंतर पोलिस खात्याकडून कसून चौकशी चालू असून सोलापूरचे सिव्हील सर्जनना अहवाल सादर करुन त्यांच्या अभिप्रायानंतर पुढील कारवाई व दिशा ठरविण्यात येणार आहे.*
*याप्रकरणी कुणालाही क्लिनचिट दिली नाही असे पोलिस सुत्रांकडून सांगण्यात आले.*
*दरम्यान आम्ही "साव असल्याचा आव" आणत काहीजणांना हाताशी धरून तिन्ही लॅबवाल्यांनी "दसहजारी" जी पेपरबाजी केली त्याबद्दल नागरिकांत उलटसुलट चर्चा सुरू असून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.*
*याबाबत पोलिस अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता आम्ही तपासप्रक्रियेत असून कुणालाही संपूर्ण कारवाई शिवाय क्लिनचीट देण्याचा प्रश्नच नसून छापलेल्या बातमीवर दिलेल्या माहितीला जाणिव पूर्वक दिलेल्या बगलेबाबत कानावर हात ठेवले असून याबाबत स्पष्टीकरण देण्याचे टाळले.सहा.निरिक्षक चिमणाजी केंद्रे यांनीही वरील स्पष्ट खुलासा केला आहे.*
*दरम्यान मंगळवारीच माढा रोडच्या समर्थ लॅबने कोरोनो संबंधित टेस्ट बंद केल्या आहेत.एका पाठोपाठ एक मुस्कान लॅब व शुभम लॅब यांनीही बुधवार पासून तपासण्या करण्याचे काम बंद केले आहे.*
*तपासण्या व काम कायदेशीर होते तर ते तिन्ही लॅबवाल्यांनी बंद का करण्यात आले? याबाबतही उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे.*
*याबाबत खोलवर चौकशी करता वरिष्ठांनी तिन्ही लॅबवाल्यांना चांगलीच तंबी दिली असून शासकीय आदेश सध्या तरी लालफितीतच असल्याचे दिसून येते.*
*दरम्यान ग्रामीण रुग्णालयाच्या अधिक्षिका सुनंदा रणदिवे यांचेशी त्यांच्या कौटुंबिक दु:खद घटनेमुळे संपर्क होऊ शकला नाही.*
*पोलिस खात्याचा वैद्यकीय क्षेत्रातील "रॅकेट"बाबतही कसून गोपनीय तपास सुरू असून त्याचा पर्दाफाश करावा व कायदेशीर कडक कारवाई व्हावी अशी मागणी नागरिकांच्या मधून केली जात आहे.*


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा