*वडूज तहसिलसमोर कॉग्रेसच्या वतीने एक दिवसीय लाक्षणिक उपोषण*
वडूज प्रतिनिधी / शरद कदम
गॅस दरवाढ, पेट्रोल दरवाढ, शेतकरी विरोधी कायदा या सह अनेक मुद्यांवर भारत बंदला पाठींबा देत शुक्रवारी खटाव तालुका राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले.
वडूज ता. खटाव येथील तहसिल कार्यालयासमोर करण्यात आलेल्या या उपोषणाला खटाव - माण राष्ट्रीय काँग्रेसचे नेते, हरणाई उदयोग समूहाचे संस्थापक चेअरमन रणजितसिंह देशमुख, पक्षनिरीक्षक झाकीर पठाण, मार्केट कमिटीचे माजी सभापती अशोकराव गोडसे, तालुकाध्यक्ष डॉ. विवेक देशमुख, माजी जि.प. सदस्य मानाजीकाका घाडगे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अनिल पवार, माजी नगराध्यक्षा डॉ. महेश गुरव, संजय गांधी निराधार योजनेचे विजयदादा शिंदे, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र खाडे आदिंची प्रमुख उपस्थिती होती.
केंद्र सरकाराने आपल्या पाशवी सदस्य संख्येच्या जोरावर संसदेत एक नवीन विधेयक आणून तमाम शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडणारा कायदा अंमलात आणला असून याशिवाय पेट्रोल, डिझेल, गॅस सिंलेडर, खाद्यतेले, डाळी इत्यादी वस्तुंच्या किमतीत भरमसाठ वाढ करून सर्वसामान्य जनतेचे जीवन मुश्किल करून ठेवले आहे. या विरूध्दात दि. २६ रोजी विविध किसान मोर्चाने पुकारलेल्या भारत बंदला आखिल भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाने जाहीर पाठींबा दिलेला असून खटाव तालुक्यातील काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी व कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सकाळी ११ ते दुपारी चार या वेळेत कोरोनाच्या सर्व अटी आणि नियम पाळून वडूज तहसिल कार्यालयासमोर उपोषण ( धरणे आंदोलन ) केले. सोनिया गांधी व राहूल गांधी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाने सदर शेतकरी व सर्व सामान्य नागरिकांच्या हिताची होळी करणाऱ्या केंद्र शासनाच्या धोरणाविरोधी वेळोवेळी आवाज उठविला आहे. त्याचाच भाग म्हणून सदर शेतकरी आंदोलनाला पाठींबा देत शेतकरी संघटनांच्या वतीने पुकारलेल्या आंदोलनात सहभागी होत राज्यातील प्रत्येक तहसिल कार्यालयासमोर कॉंग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी व पक्षाचे कार्यकर्ते यांनी उपोषण केले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा