Breaking

शनिवार, २७ मार्च, २०२१

बेंबळे व परिसरातील पोलीस भरतीसाठी प्रयत्न करणाऱ्या तरुणांनी केक कापुन केला राज्यशासनाचा निषेध

बेंबळे। प्रतिनिधी

बेंबळे व परिसरातील पोलीस भरतीसाठी प्रयत्न करणाऱ्या तरुणांनी गेली तीन वर्षे झाली तरी पोलीस खात्यातील पोलीस शिपाई पद संवर्गातील एकही जागा न भरल्याने  एका अनोख्या पद्धतीने केक कापून राज्य सरकारचा जाहीर निषेध केला आहे.

          राज्यात कोरोनाच सावट असताना सुद्धा विविध        प्रकारच्या  निवडणूका , मोठमोठे प्रचार व सभा होताना दिसत आहेत.तसेच राज्यसेवा ,आरबीआय, आरोग्य सेवक, रेल्वे, बार्क अशा विविध विभागातील परीक्षा कोरोनाचे नियम पाळुन झाल्या आहेत. तसेच येत्या 27 मार्चला इंजिनिअरिंग, एम्.पी.एस्.सी व 11 एप्रिला संयुक्त गट ब परीक्षा होणार आहेत तर असे असताना राज्य शासनाचा पोलिस भरती प्रक्रियेस विलंब का होतो आहे ? अशी विचारणा या तरुणाकडुन होत आहे.
        राज्य शासनाने लवकरात लवकर योग्य असा सकारात्मक निर्णय घेऊन पोलीस भरती प्रकियेस  सुरुवात करावी, त्यामध्ये पुर्वी जाहीर केल्या प्रमाणे 12500 पदे भरावी ,भरती प्रक्रिया एका टप्प्यात राबवावी,तसेच सरकाने शब्द दिल्याप्रमाणे प्रथम 100 मार्काची मैदानी चाचणी व नंतर 100 मार्काची लेखी परीक्षा घेण्यात यावी. 
       शासनाने त्वरीत दखल घ्यावी व भरती प्रक्रिया लवकरात लवकर राबवावी अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रातील इच्छुक युवकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल. सलग तीन वर्षे झाले पोलिस भरतीच न केल्यामुळे अनेकांच्या आशाआकांक्षावर पाणी फिरले आहे..तरी ही पोलिस भरती तातडीने करावी या मागणीसाठी एक अनोख्या पध्दतीने ,शासनास  जाणीव व्हावी म्हणुन या युवकांनी सराव मैदानात टायरवर ठेवलेला केक कापुन निषेध केला आहे.
यावेळी भारतीसाठी अभ्यास व सराव करणारे बेंबळे ,घोटी,परिते.कान्हापुरी ,मिटकलवाडी ,भोसलेवाडी येथील अनेक  युवक उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा