Breaking

गुरुवार, १८ मार्च, २०२१

हैदराबाद ते हडपसर(पूणे) रेल्वे आठवडयातून तीन दिवस धावणार*



*हैदराबाद ते हडपसर(पूणे) रेल्वे आठवडयातून तीन दिवस धावणार*
 

 जिल्हा प्रतिनिधि :जीवन भोसले 


उदगीर: हैदराबाद ते हडपसर (पूणे) 1 एप्रिल पासून आठडयातून तीन दिवस धावणार आहे. या संदर्भात दक्षिण मध्य रेल्वेने नुकतेच पत्र काढले आहे. या गाडीमुळे तेलंगणा, कर्नाटक आणि महाराष्ट्र या तीन राज्यांतील प्रवाश्यांची सोय होणार आहे.
कोरोना पूर्व काळात हैदराबाद ते पूणे गाडी आठवडयातून तीन दिवस धावत होती मात्र ती नंतर कोवीड 19 मुळे बंद झाली होती. त्यानंतर काही गाडया पूर्ववत झाल्या मात्र ही गाडी पूर्ववत झाली नाही. या गाडीच्या मागणीसाठी उदगीर रेल्वे संघर्ष समितीने लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने सातत्याने पाठपूरावा केला. दि 1 फेब्रुवारी रोजी मध्य रेल्वे मुंबई तर 22 फेब्रुवारी रोजी दक्षिण मध्य रेल्वे सिकंदराबाद येथे राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी रेल्वे महाव्यवस्थापक व उदगीर रेल्वे संघर्ष समिती यांची संयुक्त बैठक घेवून विविध मागण्या मांडल्या. यामध्ये हैदराबाद ते पूणे गाडी पूर्ववत करण्यासाठी आग्रह धरण्यात आला होता. त्यानुसार रेल्वे प्रशासनाने नुकतेच काढलेल्या एक पत्रकानुसार हैदराबाद ते हडपसर गाडी क्र 07013/14 मंजूरी देत एक एप्रिलपासून आठवडयातून तीन दिवस धावणार असल्याचे नमुद केले आहे. या गाडीमुळे हैदराबाद, विकाराबाद, जहिराबाद, बिदर, भालकी, उदगीर, लातूररोड, लातूर, उस्मानाबाद, बार्शी, कुर्डुवाडी, दौंड व हडपसर ही रेल्वे स्थानके जोडली जाणार आहे. हैदराबाद येथून रात्री 10.35 वाजता सोमवार, गुरुवार व शनिवारी ही गाडी सूटेल. बिदर येथे रात्री 12 वाजता, रात्री 1 वाजून 40 मिनीटांनी उदगीर, 3 वाजता लातूर रोड, पहाटे 4 वाजता लातूर, सकाळी 6 वाजता उस्मानाबाद तर हडपसरला (पुणे)सकाळी 10 वाजून 50 मिनीटांनी पोहचेल. परतीच्या प्रवासात हडपसर येथून मंगळवार, शुक्रवार व रविवारी दुपारी 3 वाजून 30 मिनीटांनी सुटेल, लातूर येथे रात्री 8 वाजून 53 मिनीटांनी, लातूर रोड येथे 9.30, उदगीर येथे 11.30 वाजता तर हैदराबाद येथे पहाटे 3.35 वाजता पोहचेल.
या गाडीच्या मंजूरीसाठी उदगीर रेल्वे संघर्ष समिती, राज्यमंत्री संजय बनसोडे, बिदरचे खासदार भगवंत खुबा, लातूरचे खासदार सुधाकर श्रृंगारे व उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी पाठपूरावा केला होता. सदरील गाडी दैनंदीन होण्यासाठी उदगीर रेल्वे संघर्ष समिती पाठपूरावा करीत असून प्रवाश्यांनी या गाडीला उत्तम प्रतिसाद द्यावा असे आवाहन मोतीलाल डोईजोडे यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा