Breaking

गुरुवार, १८ मार्च, २०२१

टेंभुर्णी येथे घरमालकाच्या मुलाने केला महिलेचा विनयभंग




टेंभुर्णी येथे घरमालकाच्या मुलाने केला महिलेचा विनयभंग





टेंभुर्णी (प्रतिनिधी)
घर भाडे नेण्यासाठी आलेल्या घरमालकाच्या मुलाने  महिलेचा विनयभंग केल्याची घटना टेंभुर्णी येथे घडली.
याबाबत पोलिस ठाण्याकडून मिळालेली सविस्तर माहिती अशी की पीडित महिला ही आपल्या पती व दोन मुलांसोबत घर मालक नारायण देवराव गायकवाड (रा माळेगाव) यांच्या प्लॉटमध्ये गत चार महिन्यापासून भाडेतत्वावर राहत असून 16 मार्च रोजी दुपारी एकच्या सुमारास पीडित महिला घरी असताना. घरमालक  पीडित महिलेच्या घरी आले व घर भाडे द्या अशी मागणी केली. त्यावेळी त्यांनी पती घरी नसल्याचे सांगितले. थोड्या वेळानंतर पीडित महिलेचे पती घरी आले असताना,पती सोबत घर भाड्याची चर्चा केली व घर मालक नारायण देवराव गायकवाड यांना घर भाडे घेऊन जावा असे सांगितले. थोड्या वेळानंतर घरमालक त्यांचा मुलगा व पुतण्या तसेच सोबत इतर ५ ते ६ अनोळखी इसम पीडित महिलेच्या घरी आले. तिच्या पतीने घराचा दरवाजा उघडला असता घरमालक यांच्या मुलाने हातामध्ये काठी घेऊन येत पीडित महिलेच्या पतीस कानाखाली चापट मारली व इतर सर्व लोक शिवीगाळ करून गोंधळ घालू लागले व घरातील गॅस ची टाकी बाहेर काढून ठेवली. त्या दरम्यान पीडित महिला भांडण सोडण्याकरता गेली असता. घरमालकाच्या मुलाने पीडित महिलेस नको तिथे स्पर्श करीत अंगावरील गाऊन फाडून मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले तसेच सर्वांनी मिळून शिवीगाळ करत. जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा स्वरूपाची फिर्याद पीडित महिलेने टेंभुर्णी पोलीस ठाणे येथे नोंदवली आहे. आरोपींवरती विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला असून. पुढील तपास सपोनि राजकुमार केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक अमित शितोळे हे करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा