*तानाजी भाऊ जाधव , गणेश करे पाटील यांचा पांगरे ग्रामस्थांकडून मानपत्र देऊन गौरव*
*करमाळा तालुका प्रतिनिधी- अतुल वारे पाटील*
आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला नोबेल पीस अवार्ड २०२० व अमेरिकन विद्यापीठातर्फे डॉक्टरेट पदवी मिळवल्याबद्ल टायगर ग्रूपचे संस्थापक तानाजी भाऊ जाधव तसेच उल्लेखनीय सामाजिक कार्याबद्दल गणेश करे पाटील यांचा सन्मान पांगरे येथील ग्रामस्थांकडून शानदार समारंभात करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित चौधरी उपस्थित होते.
पांगरे येथील ग्रामस्थांनी हा समारंभ आयोजित केला होता.यावेळी बोलताना यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गणेश भाऊ करे- पाटील म्हणाले, करमाळा तालुका काय ऐऱ्या गैऱ्याचा तालुका नाही. करमाळा तालुक्यातुन शैक्षणिक, राजकीय, चित्रपट निर्मिती, खेळाडू, पोलीस, आदी क्षेत्रात युवकांनी मोठ्या प्रमाणावर यश मिळवले आहे.तानाजी भाऊ जाधव यांचा आदर्श आजच्या युवकांनी डोळ्यासमोर ठेवून, वेगवेगळ्या क्षेत्रात आपली प्रगती केली पाहिजे." या प्रसंगी सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित चौधरी बोलताना म्हणाले, तानाजी जाधव, गणेश करे पाटील करमाळा तालुक्यातील हिरे आहेत. त्यांचं करमाळा तालुक्यात खुप मोठं कार्य आहे.
सत्काराला उत्तर देताना तानाजी जाधव म्हणाले की, भविष्यात करमाळा तालुक्यातील युवकांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देणे,तसेच शिक्षण क्षेत्रात तालुक्यातील युवकांनी उल्लेखनीय काम करावे यासाठी आपण सर्वोतोपरी सहकार्य करणार आहोत.
या कार्यक्रमाचे संयोजन टायगर ग्रुप, गहिनीनाथ गुंजाळ, प्रा संदीपान गुटाळ यांच्या पुढाकारातून करण्यात आले होते.
संजय गुटाळ यांनी मान्यवरांकडे पांगरे येथील तरुण वर्गासाठी व्यायाम शाळेसाठी मागणी केली.
कार्यक्रमाला मा. संजय भाऊ गुटाळ,मा.उपसरपंच पांगरे,चंद्रकांत पाटील,भारत टेकाळे, विनोद महाडिक ,पिटूदादा पारेकर,भैरवनाथ टेकाळे भैरवनाथ हराळे ,पंढरीनाथ गुरव शहाजी टेकाळे बापू मुरूमकर नागेशदादा शेडगे ,सचिन पाडसे,राजेंद्र गूरव, अमोल कुलकर्णी,प्रदिप टेकाळे,नामदेव गुटाळ , विठठल गुटाळ, अमोल पाटील, महेश गुटाळ , सोमनाथ गुजांळ , प्रकाश गुरव आदी मान्यवर उपस्थित होते. सुत्रसंचालन प्रा.संदीपान गुटाळ यांनी केले.आभार भर्तरीनाथ गुंजाळ यांनी मानले.राष्ट्रगीताने काय॔क्रमाची सांगता झाली.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा