*माजी आ. प्रभाकर घार्गे यांच्यावरील गुन्ह्याचा फेरविचार व्हावा*
*वडूज प्रतिनिधी / शरद कदम*
खटाव तालुक्यातील के.एम.शुगर साखर कारखान्यातील अधिकाऱ्याच्या मुत्यूप्रकरणी जबाबदार असणाऱ्या दोषींवर योग्य ती कारवाई करावी. मात्र या प्रकरणी माजी आमदार प्रभाकर घार्गे यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्याचा फेरविचार करून त्यांचे नाव कमी करावे अशी मागणी शहाजीराजे मित्रमंडळाच्यावतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
वडूज पोलीस स्टेशनचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.निलेश देशमुख यांना दिलेल्या निवेदनातील अधिक माहिती अशी, माजी आमदार प्रभाकर घार्गे हे गेल्या २५ वर्षापेक्षा अधिक काळ राजकीय, सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून आतापर्यंत त्यांनी केलेल्या भाषणात किंवा इतर प्रसिध्दी माध्यमातून त्यांनी कधीही कोणावर कडवट टिकाटिप्पणी केल्याचे आढळून येत नाही.
सातारा जिल्हा बँकेच्या माध्यमातून त्यांनी गावोगावच्या सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना समृद्ध केले आहे. आपल्या आमदार फंडातून दुष्काळी तालुक्यात कोट्यावधीं रूपयाची विकासकामे केली आहेत. दुष्काळी परिस्थितीत पाणीप्रश्नाबरोबर चारा छावणीच्या माध्यमातून हजारो जनावरांना चारा उपलब्ध करून दिला आहे.
सदैव जनतेच्या भल्यासाठी अहोरात्र काम करणाऱ्या घार्गे यांचा खूनासारख्या घटनेत प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष संबंध असू शकत नाही. त्यामुळे या घटना प्रकरणाच्या मुळाशी जावून सखोल चौकशी करून दोषी असणाऱ्यांवर जरूर कारवाई व्हावी मात्र साप साप म्हणून भूई धोपटत निरापराधावर कारवाई करू नये.
दिलेल्या निवेदनावर नगरसेवक शहाजी गोडसे, खटाव तालुका संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष विजय शिंदे, शिवसेना शहरप्रमुख सुशांत पार्लेकर, मधुकर मोहिते, आबासाहेब भोसले, सागर गोडसे, लालासो गोडसे, गणेश चव्हाण, विनोद चौधरी, विजय कांबळे, अतुल करांडे आदिंच्या सह्या आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा