पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेच्या प्रदेश उपाध्यक्ष पदी विनित पाटील हरडफकर यांची निवड
नांदेड जिल्हा प्रतिनिधी
बालाजी सिरसाट
AJ 24 Taas News
शेतकऱ्याची हक्काची संघटना शेतकऱ्यांच्या विविध प्रश्न शासन दरबारी सोडून घेणाऱ्या पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषि परिषदेची राज्य कार्यकारनी,जिल्हाध्यक्ष निवडीची घोषणा आज प्रसिद्धपत्रकाच्या माध्यमातून प्रदेशाध्यक्ष भागवत देवसरकर यांनी केली आहे.
महाराष्ट्रातील सर्वच भागातील पदाधिकाऱ्यांना यामध्ये स्थान देण्यात आले असून प्रदेश उपाध्यक्ष,मराठवाडा विभाग पदी माहूर येथील शेतकरी,कष्टकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी नेहमीच समाजकार्यात सतत अग्रेसर असणारे,ज्यांनी आत्ता पर्यंत विविध सामाजिक संघटनेमध्ये विविध पदावर कार्य केलेले आहे असे मा.विनित पाटील हरडफकर यांची निवड करण्यात आली.
या निवडी बद्दल नांदेड,किनवट माहूर हदगाव हिमायतनगर सर्व जिल्हा भरातून राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर तसेच मित्रमंडळी कडून विनित पाटील यांची प्रदेश उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
कोरोना प्रादुर्भाव संपल्यानंतर राज्यभर दौरा करून पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेची संघटन बांधणी मोठ्या जोमाने करून कृषि परिषदेचे कार्य राज्यभर प्रत्येक जिल्ह्यात गाव तिथे शाखा या माध्यमातून पोहचवून शेतकऱ्यासाठी मोठ्या जोमाने काम करणार असल्याचं पदाधिकाऱ्यांच्या निवडीनंतर प्रदेशाध्यक्ष भागवत देवसरकर यांनी सांगितले आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा