Breaking

मंगळवार, ३ नोव्हेंबर, २०२०

विलासराव घुमरे पतसंस्थेच्या चौकशीसाठी प्रा गोवर्धन चवरे यांचे सेंट्रल बिल्डिंग समोर उपोषण *


विलासराव घुमरे पतसंस्थेच्या चौकशीसाठी प्रा गोवर्धन चवरे यांचे सेंट्रल बिल्डिंग समोर उपोषण


AJ 24 Taas News Maharashtra
 *अतुल वारे पाटील - करमाळा*
करमाळा येथील विलासराव घुमरे नागरी सहकारी पतसंस्थेच्या चौकशीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा गोवर्धन चवरे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्ष विजयमाला चवरे यांनी पुणे येथील सेंट्रल बिल्डिंग समोर उपोषण सुरू केले आहे.
     याबाबत अधिक माहिती देताना प्रा चवरे म्हणाले की,या पतसंस्थेच्या याअगोदर झालेली चौकशी आपल्याला मान्य नसून महाराष्ट्र सहकारी कायदा 1960 -61मधील कलम 146 व कलम 143(3) नुसार या पतसंस्थेची चौकशी झाली पाहिजे. करमाळा सहाय्यक निबंधक कार्यालयाकडे या संस्थेची चौकशी देण्यात येऊ नये.तसेच यशवंतराव चव्हाण महाविद्यालय कर्मचाऱ्यांची सहकारी पतसंस्थेच्या चौकशीसाठी आपण 14 ऑक्टोबर 2020 रोजी महाराष्ट्राच्या सहकार आयुक्तांना निवेदन देऊनसुद्धा काहीही कारवाई करण्यात आलेली नाही. या दोन्हीही पतसंस्थांच्या कधीही निवडणुका झालेल्या नसून या दोन्हीही पतसंस्थांनी सभासदांना कधीही लाभांश दिलेला नाही.करमाळा येथील सहाय्यक निबंधक हे निष्पक्ष पणे कामकाज करत नसून त्यांची बदली झाली पाहिजे. आदी मागण्या घेवून आपण सेंट्रल बिल्डिंग समोर उपोषणाला बसलो असून या दोन्हीही पटसंस्थावर कारवाई होईपर्यंत आपण स्वस्थ बसणार नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा