*इंदापूर तालुक्यातील आजी व इच्छुक लोकप्रतिनिधीनी दंडाच्या पावत्याची जाहीरातबाजी बंद करून जनतेचे प्रश्न सोडवावेत.. मा.हनुमंत वीर,पश्चिम महाराष्ट्र* *युवक* *अध्यक्ष* *शेतकरी* *संघटना* ..
इंदापूर प्रतिनिधी शिवाजी पवार
..सध्या कोरोना महामारीचा परिस्थितीत कोण कशात राजकारण करेल याचा काही अंदाज नाही..कोरोना विषाणू भारतात आला. पण त्याला सुध्दा राजकारण नावाच्या विषाणूने गिळंकृत केले आहे..अशाच प्रकारे आपल्या इंदापूर तालुक्यात कोरोनाचे राजकारण करताना दिसून येत अाहे..कोरोना काळ,व अतिवृष्टीमुळे इंदापूर तालुक्यातील सर्वसामान्य जनता आर्थिक विवंचनेत होरपळून निघत आहे,कोरोनामुळे माणसात माणूस अन् दातांवर मारायला रूपया राहिला नाही.अन् आजचे लोकप्रतिनिधी व भविष्यात लोकप्रतिनिधी बनण्याचे स्वप्न पाहणारे इच्छुक मात्र एकापेक्षा एक अशा सरस दंडाच्या पावत्या सोशल मीडियावर टाकूण आम्हीपण कायदा पाळतो असा राजकीय स्टंट करून जनतेमध्ये सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत...अशा लोकप्रतिनिधीना मला हेच सांगायचे आहे कि,जरा आपल्या तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला आलेल्या कोरोनासह विविध आजाराच्या नावाखाली दवाखान्याने बनवलेल्या बिलाच्या पावत्या बघा, कर्जाच्या पावत्या,वाढीव वीजबिलाच्या पावत्या, शेतमालाच्या वजा पावत्या,महिला बचतगटांच्या वसुलीच्या पावत्या,१७ रु लिटर दूध खरेदीच्या पावत्या,१२०० रू कमी दराच्या मका पिकाच्या पावत्या,ऊस उत्पादक शेतकर्यांना कमी FRP दराच्या पावत्यावर जरा नजर फिरवली असती आणि त्यासाठी आपण काय काय केले. याचा पण खुलासा केला असता तर फार बरं झालं असतं.किवां जनतेकडील विविध पावत्यां व लोकप्रतिनिधीचा काडीमात्र संबंध येत नाही हे तरी सांगायचे होते.. खरंतर आपण १००/- ते,५००/- रूपयांची दंडाची पावती करण्यापेक्षा कोरोना काळात रोजीरोटी गमवलेल्या १००\- ते,५००\- रुपयेचा निराधार लोकांना दिवाळीचा किराणा मालाची खरेदी करून गरजूंना मदत करून आपल्या नावाचा उल्लेख करून किराणा पावत्या प्रसिद्ध केल्या असत्या तर फार बरं झालं असतं.. किमान त्या पावत्यांना वजन तरी आलं असतं.व तीच आपल्या जबाबदारीची पोचपावती झाली असती.पण या आजी व इच्छुक लोकप्रतिनिधी १००रु., व ५०० रु. च्या दंडाच्या पावत्या प्रसिद्ध करून राजकीय स्टंट करण्याचा प्रयत्न केला आहे,तसेच तालुक्यातील ग्रामपंचायत प्रशासनाला मोकाट फेंन्ड्री जनावरांचा बंदोबस्त करताज्ञ येत नाही,ते दंड आकारणी करून कसा कोरोना हद्दपार करतील याच उत्तर प्रशासनालाच माहिती ?? होय मी इंदापुरकर


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा