Breaking

सोमवार, २ नोव्हेंबर, २०२०

जेऊर मधील स्मशानभूमीत प्राथमिक सुविधांच्या अभावामुळे नागरिकांमध्ये संताप**




*जेऊर मधील स्मशानभूमीत प्राथमिक सुविधांच्या अभावामुळे नागरिकांमध्ये संताप*

*अतुल वारे पाटील- करमाळा*

  जेऊर येथील स्मशानभूमीत अनेक असुविधा असून नागरिकांमधून प्रचंड संताप व्यक्त होत आहे.
      येथील समशनभूमीमध्ये काटेरी झुडपांचे साम्राज्य पसरले असून नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. येथे वीजही उपलब्ध नसल्याने संध्याकाळी अंत्यविधी करताना अडचण निर्माण होत आहे. ग्रामपंचायत दरवर्षी आठ लाख रुपये दिवाबत्ती साठी खर्च करत आहे.येथे साधा दिवा उपलब्द्ध नाही मग एवढा खर्च ग्रामपंचायत कशावर करते असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत.

 येथील असुविधांचा प्रत्यय येथील नागरिक बाळासाहेब करचे यांना आला असून याबाबतीत बोलताना ते म्हणाले की,
आमचे नातेवाईक  हनुमंत दिगंम्बर निमगिरे यांच्या मातोश्री वय 95 वर्षे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या अंत्यसंस्कार साठी कोंढेज रस्त्यावरील सर्वधर्मीय स्मशानभूमीत पार्थिव नेले असता आम्हाला प्रचंड असुविधेचा त्रास झाला. आपली जेऊर ग्रामपंचायत दिवाबत्ती साठी वर्षाकाठी आठ लाख रुपये खर्ची घालत असताना स्मशानभूमीत साधा दिवा लावला नाही. आम्हाला अंत्यसंस्कार चारचाकी गाडीच्या उजेडात करावे लागले.

*सामान्य नागरिकांना घरपट्टी पाणीपट्टी दिल्याशिवाय दाखला उतारा देणार नाही म्हणणारे जेऊर चे कारभारी या सारख्या प्राथमिक सुविधा देण्यासाठी प्रयत्न का करत नाहीत.
*स्मशानभूमीत लाईट ची काटेरी झाडेझुडपे तोडायची व्यवस्था व्हावी अशी सामान्य जेऊरकरांची  इच्छा आहे.*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा