Breaking

सोमवार, २ नोव्हेंबर, २०२०

यावली ते सालसे रस्त्याचे काम त्वरित न झाल्यास संभाजी ब्रिगेड रास्ता रोको करणार - शंकर पोळ* *अतुल वारे पाटील -करमाळा*



*यावली ते सालसे रस्त्याचे काम त्वरित न झाल्यास संभाजी ब्रिगेड रास्ता रोको करणार - शंकर पोळ* 


*अतुल वारे पाटील -करमाळा*
यावली ते सालसे रस्ता हा मृत्यचा सापळा झाला असून या रस्त्याचे काम त्वरित न झाल्यास रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा संभाजी ब्रिगेड जिल्हा उपाध्यक्ष शंकर पोळ यांनी एक निवेदनाद्वारे दिला आहे.
     संभाजी ब्रिगेड ने कुर्डुवाडी येथील प्रांत कार्यालयातील नायब तहसीलदार मुसळे यांच्याकडे निवेदन देण्यात आले. जिल्हाधिकारी यांच्याकडे या निवेदनाद्वारे ही मागणी करण्यात आली असून यात नमूद करण्यात आले आहे की,यावली ते सालसे रस्त्याचे काम अत्यंत संथ गतीने  सुरू असुन  गेल्या दोन वर्षांमध्ये अनेकांना जीव गमवावा लागलेला आहे कित्येकांना अपंगत्व आले परंतु याकडे प्रशासनाने कुठलेही लक्ष दिलेले नाही याउलट संबंधीत ठेकेदाराला अभय देण्याचेच काम केले. चालु वर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला असुन रस्त्यावर चिखल साचलेला आहे रस्ता नावालाही शिल्लक राहीलेला नाही तरी देखील सबंधीत ठेकेदाराकडुन प्राथमिक उपाययोजना केलेल्या नाहीत. तरी सालसे - यावली रस्त्याचे काम त्वरीत पुर्ण करावे अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या वतीने 25 नोव्हेंबर रोजी सालसे या ठीकाणी रास्ता रोको करण्यात येईल असे निवेदन जिल्हाधिकारी यांचे नावे प्रांत कार्यालयीन नायब तहसीलदार   श्री.मुसळे यांच्याकडे देण्यात आले यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष  सचिन जगताप,जि.उपाध्यक्ष   शंकर पोळ,माढा विधानसभा  दिनेश जगदाळे,जिल्हा सचिव सुहास टोणपे,  संभाजी ब्रिगेड माढा तालुकाध्यक्ष शिवश्री बालाजी जगताप,करमाळा तालुकाध्यक्ष  अमित घोगरे, तालुका सचिव गणेश डोके,माढा ता.कार्याध्यक्ष  भारत लटके,अविनाश पाटील माढा ता.उपाध्यक्ष,सचिन पराडे पाटील -महाळुंग गट प्रमुख, शंकर ऊबाळे आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा