Breaking

रविवार, ८ नोव्हेंबर, २०२०

३८ लाखांचा अपहार केल्या प्रकरणी संस्थाचालक कोरके, मुख्याध्यापक यांचा जामीन अर्ज फेटाळला




३८ लाखांचा अपहार केल्या प्रकरणी संस्थाचालक कोरके, मुख्याध्यापक यांचा जामीन अर्ज फेटाळला



*बार्शी प्रतिनिधी सिद्धेश्वर जाधव*
बार्शी (प्रतिनिधी)- शिक्षण संस्थेत कार्यरत असलेल्या चार शिक्षकांचा ३८ लाख ८२ हजार ५१८ रुपये थकीत वेतन शासनाकडून जमा झाले असताना, त्यांच्या परस्पर स्वतःच्या खात्यावर जमा करून अपहार केल्या प्रकरणी बार्शी तालुक्‍यातील सर्जापूर येथील जय जगदंबा बहुउद्देशीय संस्थेचे सचिव आणि माध्यमिक आश्रम शाळा जमगाव येथील मुख्याध्यापक यांनी दाखल केलेले प्रत्येकी चार गुन्ह्यांतील चार अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एस. पाटील यांनी फेटाळले.
सचिव बाळासाहेब नरहरी कोरके व जामगाव येथील माध्यमिक आश्रमशाळेचे मुख्याध्यापक पांडुरंग महादेव कानगुडे यांच्याविरोधात फसवणूक व अन्य कलमान्वये चार गुन्हे माढा पोलिस ठाण्यात दाखल झाले होते.
सदरचे गुन्ह्यातील आरोपी यांना तात्काळ अटक करावी आणि आरोपींना सहकार्य करणारे माढा पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक यांचे विरुद्ध प्रशासकीय कारवाई करावी अशी मागणी जेष्ठ पत्रकार आप्पासाहेब पवार यांनी सोलापूर ग्रामीण चे पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा