*एजे 24 तास न्युज च्या झटक्याने वीजवितरणवीज पुरवठा केला सुरळीत*
****************-****
*चोवीस तासांत वीज पुरवठा पूर्ववत...*
*सिध्देश्वर नगर मधील नागरिकांनी सोडला नि:श्र्वास...*
**********************************
*कुर्डूवाडी प्रतिनिधी/ अरुण कोरे*
वीज वितरण कंपनीच्या गलथाण कारभारामुळे कुर्डुवाडी शहरातील सिध्देश्वर नगरातील नागरिकांना दोन महिन्यांपासून जीव मुठीत धरून जगावे लागत असल्याबाबतचे "एजे 24 तास न्यूज ने" वृत प्रसिद्ध होताच वीज वितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची बेफीकेरी सहा नोव्हेंबरला चव्हाट्यावर आल्यावर सगळ्यांची पळापळ झाली.
गेल्या दोन महिन्यांहून अधिक काळ वीजेची तार धोकादायक स्थितीत लोंबकळत असल्याने नागरिक जीव मुठीत धरून जगत होते.. वारंवार खांबावर स्फोट होणे,स्पार्किंग होणे, विद्युत पुरवठा मिनीटागणीस खंडित होणे,घरगुती उपकरणांचे नुकसान आदी त्रासाने नागरिक वैतागलेले होते.
याबाबत तक्रारी देवूनही कुर्डुवाडीत त्याची दखल घेतली जात नसल्याने मुंबईला आमचे प्रतिनिधी अरुण कोरे पत्रकार यांनी १२ आक्टोंबरला तक्रार नोंदवली होती.मुबई कार्यालयानेही सोलापूर,बार्शी, कुर्डुवाडी कार्यालयाला महिनाभरात वारंवार आदेश दिले पण सर्वजण हात वर करुन जबाबदारी झटकत होते.अखेरिस नागरिकांच्या वतीने अरुण कोरे यांनी २ नोव्हेंबर रोजी वीज वितरणच्या गैरकारभाराबाबत कुर्डुवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.*
*सहा नोव्हेंबरला विशेष बुलेटिनच्या माध्यमातून गैरकारभार चव्हाट्यावर आणल्यानंतर सगळ्यांची पळता भुई थोडी झाली.
पोलिस खात्याकडून चौकशी सुरू झाल्या नंतर व पोलीसी बडग्याचा चांगलाच करंट दिल्यानंतर सगळ्यांची धावपळ सुरू झाली.सहाय्यक पोलिस निरीक्षक चिमणाजी केंद्रे,तपाशी अंमलदार सहदेव जगदाळे यांनी तपास करीत समज दिल्यानंतर संबंधित ताळ्यावर आले.
जबाबदारी कुणाची हे न पहाता नगरपालीकेचे वीज विभाग प्रमुख पर्यवेक्षक अतुल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली रमेश शिवशरण, ठेकेदार अमजद पठाण,संतोष बागल यांच्या टिमने विशेष परिश्रम घेवून चोवीस तासांच्या आतच सात नोव्हेंबरला दुपारी तुटलेल्या लोंबकळणा-या तारा जोडल्या,वीज पुरवठा पूर्ववत केला.यावेळी वीज वितरण खात्याचे सलमान शेख व त्यांचें सहकारी उपस्थित होते.
विशेष म्हणजे बंद असलेले बल्प्स बसवून स्ट्रीट लाईटही चालू झाल्या.*
धोका टळल्याने व वीज पुरवठा पूर्ववत झालेने सिध्देश्वर नगर मधील नागरिकांनी नगरपालीकेच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करीत नि:श्वास सोडला आहे.*


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा