*ग्रामीण भागाशी नाळ जुळलेला युवक :- रामराजे भोसले*
AJ 24 Taas News Maharashtra
लातूर प्रतिनिधी जीवन भोसले
*लातूर*/संपूर्ण जगामध्ये कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढत आहे. केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाने रोगप्रतिकार शक्तीवाढविण्यासाठी अर्सेनिक अल्बम-३० औषध सुचविले आहे. मुंबई सारख्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची संख्या आढळत असताना अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाअंतर्गत संचालक नागरी पुरवठा विभागात जिवाची बाजी लावून शासकीय कामकाज समर्थपणे पार पाडणारे रेशनिंग इन्स्पेक्टर, श्री रामराजे भोसले यांनी आपल्या गावाची नाळ कधी तोडलीच नाही. सतत आपल्या गावासाठी काही करता येईल का? हा विचार त्यांच्या मनात कायम असतो. याच विचारातून लाॅकडाउनच्या काळात सुहागन, आव्हई, देगाव, मरसूळ, बरबडी, आडगाव, गोविंदपूर, पांढरा (ढोणे), पिंपळा लोखंडे, चुडावा, हिवरा, धोतरा, रूपला पांढरी, सोनखेड पांढरी, आलेगाव सवराते, धार ता. पूर्णा जिल्हा परभणी येथील एकूण १७ गावांमध्ये जवळपास ४० हजार नागरिकांना अर्सेनिक अल्बम ३० चे जनस्वराज्य फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री रामराजे भोसले यांनी जनस्वराज्य (संत रोहिदास) फाउंडेशनच्या माध्यमातून होमिओपॅथी औषधाचे मोफत वाटप केले आहे. येत्या काळात जनस्वराज्य फाऊंडेशनच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जनतेच्या हिताकरीता नवनवीन उपक्रम राबवले जातील अशी माहिती फाऊंडेशनचे रामराजे भोसले व शिवश्री संतोष साखरे सर यांनी*आज24तास न्यूज* चे तालूका प्रतिनिधी जीवन भोसले यांना दिली.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा