टेंभुर्णीतील जीवित वित्तहानीस जबाबदार असणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी
टेंभुर्णी बाजार तळावर टेंभुर्णी ग्रामपंचायतने ओड्यामध्ये बाजार कट्टे बांधून अतिक्रमण केलेले दिसत आहे
टेंभुर्णी ग्रामपंचायत ओढ्याची रुंदी अरुंद करून भिंत बांधून ओढा लहान केलेला दिसत आहे
*
*टेंभुर्णी प्रतिनिधी
टेंभुर्णी : - टेंभुर्णी ग्रामपंचायतच्या नियोजनशून्य कारभारामुळे शहरातील ओढ्यास आलेल्या पुराच्या पाण्याने जीवित व मोठ्या प्रमाणात वित्त हानी झाली आहे.यास जबाबदार ग्रामविस्तार अधिकारी व संबंधित पदाधिकारी यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी कैलास सातपुते यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांना दिलेल्या निवेदनात कैलास सातपुते पुढे म्हटले आहे की,टेंभुर्णी ग्रामपंचायतीने ओढ्याच्या पात्रात केलेले अतिक्रमण,प्राधिकरणाने काँक्रीटने ओढ्यात भिंत बांधून आडविलेले पाणी,ओढ्यात आडवा बांधलेला बंधारा,ओढ्यातून चेंबर बांधून केलेली भूमिगत गटार या कारणांनी पुराचे पाणी मोठ्या प्रमाणात शहरात घुसून नागरिकांची वित्तहानी झालेली आहे.
या सर्व बाबींचा विचार करून तातडीने कार्यवाही व्हावी.अन्यथा यानंतर ही अशाच पद्धतीचा पाऊस आल्यास अनर्थ घडणार नाही याची दक्षता घ्यावी.ग्रामपंचायतीने गावातील ओढ्यात बाजार कट्टे बांधले आहेत असून ओढ्यात भिंत बांधून व मुरूम टाकून पात्र अरुंद केलेले आहे.प्राधिकरणाने अशुद्ध पाणी शुद्धीकरण करण्याच्या नावाखाली प्रकल्पासाठी ओढ्यात दोन ठिकाणी अडविलेले पाणी त्वरित रिकामे करावे.पुलाजवळ काँक्रीट टाकलेली भिंत व अशुद्ध पाणी प्रकल्पाजवळ अडविलेला ओढा त्वरित रिकामा करावा.ओढ्यातून टाकलेली भिंत काढून घ्यावी.
ग्रामपंचायत व प्राधिकरण यांच्या अडमुठे पणाने व चुकीच्या धोरणाने शहरातील ओढ्यात पाणी साचून राहिले.यामुळे पाणी प्रचंड फुगल्याने ते थेट लोकांच्या घरात शिरले.यामुळे ग्राहपयोगी साहित्य,अन्नधान्य, घरे याचे आतोनात नुकसान झाले. यातच उद्धव बापू खरात यांचा याच पाण्यात बुडुन मृत्यू झाला.वेळोवेळी याबाबत ग्रामपंचायतकडे तक्रारी केल्या पण लक्ष दिले नाही.यामुळे वेळेत कार्यवाही करावी अन्यथा नागरिकांच्यासह उपोषण केले जाईल असा इशारा ही सातपुते यांनी दिला आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा