*पै. तानाजी जाधव यांच्या वाढदिवसा निमित्त रक्तदान शिबिरात ५० जणांचे रक्तदान*
********************************
*AJ 24 Taas News Maharashtra
*टेंभुर्णी प्रतिनिधी/गणेश चौगुले
टेंभुर्णी : कोरोनामुळे निर्माण झालेली राज्यासमोरील रक्त संकटात सहभाग नोंदविण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी रक्तदान करण्याचे आवाहन केल्यानंतर पै. टायगर ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली व टायगर ग्रुपची रणरागिनी कविता चव्हाण. पै.तानाजी जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त टेंभुर्णी येथील टायगर ग्रुप यांच्या सहकार्याने पुष्पक मंगल कार्यालय येथे २६ ऑक्टोबर रोजी सकाळी १० ते ५ या वेळेस रक्तदान शिबिर आयोजित केले होते. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सुरक्षित अंतर सॅनिटायझर आणि मास्कचा वापर करण्याची खबरदारी घेतली जात होती. या रक्तदान शिबीरात ५० इतक्या रक्तदात्यांनी सक्रीय सहभाग घेवुन रक्तदान केल्याचे दिसुन आले.
या रक्तदान शिबीरात रक्त संकलनासाठी जत येथील सत्यम ब्लड बँक या रक्तपेढी चा सहभाग झाला होता. या रक्तदान शिबीरात रक्तदान करणाऱ्या सर्व रक्तदात्यांना टायगर ग्रुपच्या रणरागिनी कविता चव्हाण व लखन माने, अमीर काझी यांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. तसेच टेंभुर्णी पोलीस ठाण्या मध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित शितोळे, सुशील भोसले, टायगर ग्रुपच्या रणरागिनी कविता चव्हाण यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी सापाटणे (टें)गावचे सरपंच दत्तात्रय ढवळे- पाटील, लखन माने, अण्णासाहेब ढवळे-पाटील, अमीर काझी, परशुराम कदम, केतन पोपळे, आप्पा सुतार यांच्यासह टायगर ग्रुपचे युवक मोठया संख्येने उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा