Breaking

रविवार, ११ ऑक्टोबर, २०२०

टेंभुर्णीतील ऑक्सिजन प्रोसेस प्रकल्पास जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची भेट


टेंभुर्णीतील ऑक्सिजन प्रोसेस प्रकल्पास जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची भेट

टेंभुर्णी /प्रतिनिधी

टेंभुर्णी : - टेंभुर्णी येथील औद्योगिक वसाहतीतील ऑक्सिजन प्रोसेस प्रकल्पास जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी गुरुवारी सायंकाळी अचानक भेट देऊन प्रकल्पाचे संचालक राजाभाऊ शिंदे यांच्याकडून ऑक्सिजन प्रोसेस प्रक्रिया जाणून घेतली.तसेच कोविड-१९ प्रादुर्भाव ग्रस्त रुग्णांसाठी ऑक्सिजन पुरवठा खंडित होऊ नये यासाठी खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या.


टेंभुर्णी औद्योगिक वसाहतीत एस.एस.बॅग्ज अँड फिलर्स प्रा.लि.हा ऑक्सिजन प्रोसेस प्रकल्प असून या ठिकाणी बाहेरून लिक्विड आणून त्याचे वेफराईज करून ऑक्सिजन गॅस मध्ये रूपांतर केले जाते.


तसेच हवेचे विघटन करून नको असलेला नायट्रोजन व इतर वायू वेगळे करून ऑक्सिजन मिळविला जातो.त्यास वजा १९८ सेंटिग्रेड तापमान देऊन त्याचे लिक्विडमध्ये रूपांतर करून ऑक्सिजन गॅस तयार केला जातो.अशा दोन्ही पद्धतीने याठिकाणी ऑक्सिजन गॅस बनविला जातो.हा ऑक्सिजन प्रकल्प २४ तास चालू ठेवावा लागतो.

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी प्रकल्पाची पहाणी करून संपूर्ण ऑक्सिजन निर्मिती प्रोसेस प्रक्रिया  जाणून घेऊन प्रकल्पाबाबत समाधान व्यक्त करून धन्यवाद दिले.कोविड-१९ संसर्गग्रस्त रुग्णांच्या उपचारासाठी ऑक्सिजन वरदान ठरत आहे.यामुळे ऑक्सिजनचा विषय सध्या ऐरणीवर आहे.


यावेळी जिल्हाधिकारी यांच्या समवेत प्रांत धिकारी ज्योती कदम,तहसीलदार राजेश चव्हाण,टेंभुर्णी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ.अमोल माने,डॉ.दादासाहेब माने,एपीआय अमित भोसले,टेंभुर्णीच्या मंडल अधिकारी मनिषा लकडे,अमित शिंदे,तलाठी प्रशांत जाधव,तलाठी बी.के.खुळे,प्रकल्पाचे मॅनेजर कालिदास निकम,लक्ष्मण शिंदे,कोतवाल रशीद शेख आदीजन उपस्थित होते. 


चौकट : -

हवेचे विघटन करून त्यातून ऑक्सिजन वेगळा करणारे टेंभुर्णी,लातूर व पुणे असे महाराष्ट्रात फक्त तीनच प्रकल्प आहेत.या प्रकल्पाची प्रतिदिन पाचशे सिलेंडर क्षमता असून जिल्ह्यात मेडिकल वापरासाठी गॅसची संपूर्ण गरज या प्रकल्पातून पूर्ण केली जात आहे.या प्रकल्पासाठी आ.बबनराव शिंदे यांनी वेळोवेळी सूचना देऊन मार्गदर्शन,सहकार्य केले आहे.

-राजाभाऊ शिंदे-मुख्य प्रकल्प संचालक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा