Breaking

रविवार, ११ ऑक्टोबर, २०२०

इंदापूर तालुक्यात काॅंग्रेस पक्षाला लवकरच चांगले दिवस येतील. अामदार संजय जगताप.


इंदापूर तालुक्यात काॅंग्रेस पक्षाला लवकरच चांगले दिवस येतील. अामदार संजय जगताप

इंदापूर प्रतिनिधी शिवाजी पवार

पुणे जिल्हा काँग्रेस कमिटी पुणे येथे झालेल्या बैठकीत इंदापूर तालुक्यातील कार्यकर्त्यांना पुणे जिल्हा अध्यक्ष आमदार मा. संजय जगताप यांच्या हस्ते विविध  पदांचे  नियुक्तीपत्र देण्यात आले. या वेळी इंदापूर तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष म्हणून सणसर गावचे सुपुञ आबासाहेब निंबाळकर यांना जबाबदारी देण्यात आली. निमगाव केतकी येथील विपुल भिलारे याना विध्यार्थी काँग्रेसचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून संधी देण्यात आली आहे , तसेच वालचंदनागर येथील युवा कार्यकर्ते मिलिंद साबळे यांना इंदापूर तालुका युवक काँग्रेसच्या सरचिटणीस पदी नेमणुक करण्यात आली आहे .

यावेळी बोलताना पुणे जिल्हा काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आमदार संजय जगताप म्हणाले की, इंदापूर तालुक्यात काँग्रेस पक्ष  वाढवणेसाठी योग्य पद्धतीने कामकाज करुन सर्वांना विश्वासात घेऊन तालुका अध्यक्ष स्वप्नील सावंत सर्व कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन पुढील वाटचाल करीत असून  त्यांच्या नेतृत्वाखालील तालुक्यातील काँग्रेस पक्ष  वाढविणेसाठी   भविष्यात मोठे केले जाईल.

यावेळी बोलताना तालुकाध्यक्ष स्वप्नील सावंत म्हणाले की इंदापूर तालुक्यातील सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यावर महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून    आमदार संजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली प्रयत्न करणार अाहे. यासाठी संजय जगताप यांचे चांगले सहकार्य असल्यामुळे आज इंदापूर तालुक्यात काँग्रेस पक्ष मोठ्या प्रमाणात वाढीस लागला आहे. अनेक लोकांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

या वेळी बारामती चे वीरधवल गाडे, तालुका काँग्रेसचे कार्याध्यक्ष काकासाहेब देवकर, वरिष्ठ उपाध्यक्ष बिभीषण लोखंडे , इंदापूर शहराध्यक्ष तानाजी भोंग, विध्यार्थी तालुका अध्यक्ष शंभूराजे साळुंखे , महिला जिल्हा अध्यक्ष सीमा सावंत, जिल्हा उपाध्यक्ष संग्राम मोहळ ,जिल्हा विध्यार्थी अध्यक्ष भूषण रानभरे आदी उपस्थितीत होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा