Breaking

बुधवार, २१ ऑक्टोबर, २०२०

बिबट्याचा पुन्हा निमगाव परिसरामध्ये 5 शेळ्या वरती हल्ला. वन खात्याला पकडण्यास अपयश




*बिबट्याचा पुन्हा निमगाव परिसरा मध्ये 5शेळ्या वरती हल्ला. वन खात्याला पकडण्यास अपयश


एस बी शिदे वार्ताहर निमगाव टे


निमगाव टे दि 21 माढा तालुक्यातील निमगाव दहिवली उपळवटे कंदर कन्हेरगाव ढवळस शेडशिगे सातोली या गावातील शिवारात बिबटयाचा वावर आहे

मंगळवारी रात्री दहिवली येथील उज्वला निवास खोचरे याची शेळी बिबटयाने फस्त केली असुन या आठवड्यात निमगाव 2 दहिवली 1 व कंदर येथे दोन शेळया बिबटयानजिवमुल्याने या पःरिसरात शेतकर्यांना मधून प्रचंड घबराट पसरली असुन  वस्तिवर रहाणारे शेतकरी जीव मुठित घेउन जगत आहेत
शेतात मजूर ही कामास धजावत  नाहीत शिवारे बिबटयाच्या भितीने ओसपडली असुन वन खात्याने मात्र फक्त एक ठिकाणी बिबट्या पकडण्यासाठी सापळा लावला आहे
या परिसरात वनखात्याने या बिबटयाचा प्रभावी पणे बदोबस्त करून बिबट्या पकडावा व शेतकऱ्यांची बिबट्या पासून सुटका करावी अशी मागणी होत आहे
आठदिवसात पाच शेळ्या बिबटयाने खाउन सुधा बिबटयाचा बदोबस्त करण्यात वनखाते अपयशी ठरले असुन वनखात्याच्या कारभाराविषयी शेतकऱ्यांतुन संताप व्यक्त होत आहे
    सध्या पेरणीची व शेतीच्या मशागत ची कामे शेतात सुरू आहेत परंतु बिबट्या कोठेही येईल आणी हल्ला करेल यामुळे जनावरे शेळ्या कोणीही चरावयास सोडत नाहीत लहान मुले म्हातारी मानसे जिवमठित धरून वावरत आहेत पोलीस व वनखाते एखाद्या व्यक्ती चा बिबटयानेजिव घेन्याची वाटपहातआहे का असा सवाल या परिसरातील नागरिकांतुन विचारला जात आहे




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा