Breaking

बुधवार, २१ ऑक्टोबर, २०२०

*प्रहार जनशक्ती च्या वतीने दिले इंदापूर नगरपालिकेला निवेदन**रेडा


*प्रहार जनशक्ती च्या वतीने दिले  इंदापूर नगरपालिकेला निवेदन*

*रेडा  प्रतिनिधी/ शशिकांत सोनटक्के*

रेडा दि 20 
 प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष   बच्चुभाऊ कडू-पाटील राज्यमंत्री महाराष्ट्र शासन यांच्या मार्गदर्शनाखाली व पुणे जिल्हा संघटक  नीरज भाऊ कडू -पाटील यांच्या अध्यक्ष खाली 
इंदापूर तालुका अध्यक्ष संजय राऊत  व  तालुकाउपाध्यक्ष शशिकांत सोनटक्के व शहराध्यक्ष अनिल मोहिते व तानाजी (अण्णा )धोत्रे प्रदेश सरचिटणीस भटक्या विमुक्त जाती संघटना महाराष्ट्र राज्य  यांनी मुख्याधिकारी  इंदापूर नगरपालिका इंदापूर यांना दिव्यांग बांधवांची सविस्तर माहिती मिळणे साठी निवेदन दिले आहे. 
 इंदापूर नगरपालिका हद्दीतील राहत असलेल्या व नगरपालिकेकडे नोंदणीकृत असलेल्या सर्व  दिव्यांग बांधवांची ‌ संकलित यादी मिळावी
तसेच नगरपालिकेकडून मागील पाच वर्षात देण्यात आलेल्या अनुदान व दिलेल्या सर्व लाभ याबाबतची सविस्तर माहिती मिळावी तसेच 5/टक्के अपंग अनुदान शिल्लक असल्यास ते वाटप का केले नाही याची माहिती मिळावी अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्ष इंदापूर यांच्यावतीने करण्यात आली आहे निवेदन वेळी पांडु( बाबा) मोहिते‌
युवा कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा