*मायक्रो फायनान्स कंपण्यांचे महिला बचत गटाकडील कर्ज माफ करावे लहुजी शक्ती सेनेची मागणी*
प्रतिनिधी /रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद
*AJ 24 Taas News Maharashtra YouTube channel*
मायक्रो फायनान्स कंपण्याकडून महिला बचत गटाच्या महिलानी घेतलेले कर्ज कोरोना काळातील थकीत हप्ते माफ करावे ह्या मागमीचे लेखी निवेदन
लहुजी शक्ती सेना तुळजापूर तालुक्याच्या वतीने तुळजापूर तहसील कार्यालयाकडे देण्यात आले आहे.निवेदनात म्हटले आहे, की तालुक्यात अनेक महिला बचत गटांना व वैयक्तीक सेवा व्यवसायीक यानां मायक्रो फायनान्स कंपण्या कडून कर्ज वितरण करण्यात आलेले आहे. पुर्वी सदरील बचत गटानीं घेतलेले कर्ज वेळेत परत फेड केलेले आहे.त्यानंतर मात्र कोरोनाच्या काळात लाँकडाऊन, जनता कर्फ्यू, संचार बंदी आदी कारणाने रोजगार उपलब्ध झाला नाही.त्यामुळे कर्जाची परत फेड वेळेत करता आली नाही, असे असताना मायक्रो फायनान्स कंपण्याकडून कर्ज परतफेड/ वसुली बाबत तगादा (सक्तीने)सुरु आहे. याचा परिणाम महिला आत्महत्या करण्याच्या मानशीकतेमध्ये आहेत.हे गंभीर असून कोरोना काळातील सध्य स्थिती पाहाता व्याज व मुद्दल पुर्ण माफ करावे.
संबंधीत जबाबदार यानीं महिला बचत गट तसेच इतरही वैयक्तीक वाटप केलेले कर्ज माफ करावे.असे नमुद केले आहे.अन्यथा लहुजी शक्ती सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात ईशारा दिला आहे. होणाऱ्या परिणामास मायक्रो फायनान्स कंपणीस जबाबदार धरावे,अशीही विनंती केली आहे.
निवेदनावर तालुकाध्यक्ष किसनभाऊ देडे,उपाध्यक्ष कुंडलीक भोवाळ,विजय कांबळे,संजय भाऊ गायकवाड, मारुती कांबळे,कृष्णा डोलारे,अमोल सगट,किशोर सगट,शाम पारधे,हनुमंत गवळी,बंडू शेंडगे,सुरज सगट आदींच्या सह्या आहेत.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा