Breaking

मंगळवार, २२ सप्टेंबर, २०२०

*सकल मराठा समाजाच्या बंदला टेंभुर्णीत उत्स्फूर्त प्रतिसाद**AJ 24 Taas News Maharashtra*




*सकल मराठा समाजाच्या  बंदला टेंभुर्णीत  उत्स्फूर्त प्रतिसाद*



टेंभुर्णी प्रतिनिधी *AJ 24 Taas News Maharashtra*

टेंभुर्णी (प्रतिनिधी ):- मराठा समाजाचा सरसकट इतर मागास प्रवर्गामध्ये समावेश करावा व त्यांना मिळालेले आरक्षण कायम ठेवण्यात यावे या मागणीसाठी टेंभुर्णी सकल मराठा समाजाच्या वतीने छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याजवळ शासनाला निवेदन देण्यात आले यावेळी निवेदन स्वीकारण्यासाठी टेंभुर्णी मंडलाधिकारी मनीषा लकडे, टेंभुर्णी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे उपस्थित होते ,जिजाऊ ब्रिगेडच्या सोलापूर जिल्हाध्यक्ष सुरजा बोबडे यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले.

मराठा समाजाला मिळालेल्या आरक्षणास सर्वोच्च न्यायालयाने स्थगित केल्याने सकल मराठा समाजाच्या वतीने दि.२१ सप्टेंबर रोजी सोलापूर जिल्हा बंद ची घोषणा करण्यात आली होती त्यास टेंभुर्णी सह जिल्ह्यात उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. यापूर्वी सकल मराठा समाजाच्या वतीने ५८ मूक मोर्चे काढून जागतिक रेकॉर्ड केले होते. कुठलेही गालबोट न लागता शांततेत मूक मोर्चे काढून एक आदर्श निर्माण केला होता तरी देखील केंद्र सरकार व राज्य सरकार कडून याची गंभीर दखल घेतली जात नाही येथून पुढे शासनाला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला.

यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सचिन जगताप, जि.प.सदस्य प्रतिनिधी बंडू नाना ढवळे,मनोजकुमार गायकवाड-उमेदवार,पुणे पदवीधर मतदार संघ ,सुरजा बोबडे जिल्हाध्यक्ष, जिजाऊ ब्रिगेड,योगेश बोबडे-तालुकाध्यक्ष भाजपा, राजकुमार धोत्रे- जिल्हाध्यक्ष, वडार पँथर,   रामभाऊ वाघमारे    मातंग एकता आंदोलनचे,सतीश चांदगुडे-ता.कार्याध्यक्ष,संभाजी ब्रिगेड,गोरख देशमुख,दयानंद महाडिक, संभाजी ब्रिगेडचे ता.संघटक नितीन मुळे, शहराध्यक्ष सचिन खुळे,विजय खटके,हनुमंत चव्हाण-मा.सरपंच चव्हाणवाडी, कांतीलाल नवले मा.सरपंच, फुटजवळगाव,प्रा.दिपक पाटील,विजय काळे,विलास कोठावळे,राहूल टिपाले, सोमनाथ महाडीक,हरी सटाले, पिंटू देशमुख,रणजित आटकळे,दादा देशमुख,रमेश टिपाले,शिला सटाले,रत्नमाला शिंदे,बाळासाहेब पवार,हनुमंत तावरे,दिग्विजय पाटील,सोनाजी पाटील,गणेश यादव,सुधीर पाटील,पपेश पाटील,दिलीप पाटील,राजकुमार पाटील, प्रा.नागनाथ महाडीक, आदी सकल मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सोलापूर जिल्हा बरोबर टेंभुर्णी शहरही अत्यावश्यक सेवा वगळता 100% सकल मराठा क्रांती ला पाठिंबा देण्यासाठी टेंभुर्णी शहर बंद होते. कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून टेंभुर्णी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे व सर्व स्टॉप नी शहरात चोख बंदोबस्त ठेवला होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा