Breaking

सोमवार, २१ सप्टेंबर, २०२०

टेंभुर्णी बायपास लगत ने सोलापूर पाणीपुरवठा पाईप लाईन करण्यासाठी तीव्र विरोध *AJ 24 Taas News Maharashtra


टेंभुर्णी बायपास लगत ने सोलापूर  पाणीपुरवठा पाईप लाईन करण्यासाठी तीव्र विरोध          
*टेंभुर्णी / प्रतिनिधी    *AJ 24 Taas News Maharashtra


 टेंभुर्णी (प्रतिनिधी)येथील शेतकरी अणि व्यापारी यांनी सोलापूर पाणीपुरवठा योजनेची समांतर पाईप लाईन चा सर्वे करताना अत्यंत चुकीचा केला आहे  त्या मध्ये टेंभुर्णी येथे पाईप लाईन ही बायपास च्या बाजूने केला असून तेथे शेतकर्‍यांच्या च्या  ज्या  जागा बायपास  मध्ये गेल्या गेल्या आहेत त्याचेच थोडेसे शेती उरली आहे  त्यात जवळपास सर्वच शेतकऱ्यांनी व्यावसायिक व रहिवासी बांधकाम केले असून तसेच  टेंभुर्णी शहरातील जे व्यावसायिक ज्यांचे व्यवसाय हे हायवे वर  अवलंबून होते त्यांनी लाखो रुपये खर्चून जागा घेऊन बायपास च्या कडेला आपले नुकतेच व्यवसाय चालू केले आहेत  त्या मुळे येथून पाईप लाईन गेल्यास कोट्यावधी रुपयांचे नुकसान होणार आहे. त्यातच बायपास कडेला पाईप लाईन चा सर्वे झाले मुळे आता टेंभुर्णी तील शेतकर्‍या चि  अवस्था आगीतून उठून फुफाट्यात पडले सारखी झाली आहे. ज्यांनी आपली ईतर मालमत्ता  विकून किंवा बॅंका कडून कर्ज काढून जागा घेऊन व्यवसाय उभे केले आहेत ते  व्यावसायिक ह्या सर्वे मुळे हवालदिल झाले आहेत. सदर कमी  विशेष भूसंपादनअधिकारी उपजिल्हाधिकारी सुर्यवंशी यांचे उपस्थितीत झालेल्या सुनावणीत सर्वे बाधित रहिवासी शेतकरी, व्यावसायिक   सदर संपादनासाठी यांनी तीव्र विरोध दर्शविला होता. त्यानंतर करमाळा -माढा मतदारसंघा चे आमदार संजय मामा शिंदे यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत या वर चर्चा होऊन पर्यायी मार्गाने अथवा  खुल्या शेती तून पाईप लाईन न्यावी असे ठरले तरी सुद्धा  संबंधितांना  दी.21/9/20  रोजी  च्या मोजणी च्या नोटीस बजावण्यात आल्या होत्या त्या प्रमाणे मोजणी अधिकारी आले असता मोजणी करण्यास विरोध केला तसेच महापालिका प्रशासनाने त्याचा कोणताही प्रतिनिधी उपस्थित केला नाही मोजणी अधिकारी यांनी संबंधितांना फोन केला असता संपर्क झाला नाही .सदर प्रकार हा अतिशय अन्यायकारक असून आधीच बायपास, midc, ntpc पाईप लाईन, इ.बेजार झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळावा अशी मागणी होत आहे. सदर प्रकरणी योग्य निर्णय न झालेस तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संबंधित बाधित शेतकऱ्यांनी दिला आहे.या वेळी    जिल्हा परिषदेचे सदस्य प्रतिनिधी तुकाराम ऊर्फ बंडू नाना ढवळे, रावसाहेब नाना देशमुख,  गोरख खटके सर, अमोल धुमाळ, अनपट सर, नाळे सर ,,  पत्रकार रोहिदास  साळुंखे सर  पत्रकार नाना पाटील, पत्रकार  सचिन होदाडे व बहुसंख्येने बाधित शेतकरी व व्यावसायिक उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा