महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाकडून संपादक बाबा शिंगोटे यांना आदरांजली
------------------------------------------
*aj24taas news*
इंदापूर [प्रतिनिधी] शिवाजी पवार
इंदापूर : दैनिक पुण्यनगरी वृत्तपत्र समूहाचे संस्थापक, वृत्तपत्र सृष्टीतील चमत्कार आदरणीय मुरलीधर (बाबा) शिंगोटे यांचे आज निधन झाले त्यांना शहर ग्रामीण मराठी पत्रकार संघ इंदापूर तालुका व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ इंदापूर तालुका यांच्या वतीने भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली.
यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष नीलकंठ मोहिते, मार्गदर्शक मधुकर गलांडे, पुणे जिल्हा संपर्क प्रमुख महेश स्वामी, मुख्य सचिव सागर शिंदे, कार्यकारणी सदस्य निखिल कणसे, शिवाजी पवार, शिवकुमार गुणवरे, लक्ष्मण सांगवे आदी उपस्थित होते.
यावेळी आदरांजली वाहताना महेश स्वामी म्हणाले की, आमचे दैवत असलेल्या बाबांचे अनपेक्षित निघून जाणे, फारच वेदनादायी आहे. महाराष्ट्रातील असंख्य तरुणांचे वृत्तपत्र व्यवसायाच्या माध्यमातून संसार उभे करण्यात बाबांचे मोठे योगदान आहे. वृत्तपत्र विक्रेता ते महाराष्ट्रातील द्वितीय क्रमांकाच्या वृत्तपत्र समुहाचे मालक असा त्यांचा प्रवास मराठी माणसाला प्रेरणादायी आहे. यावेळी महेश स्वामी खूप भावुक झाले.
______________________________________
फोटो ओळ : इंदापूर येथे मुरलीधर ( बाबा ) शिंगोटे यांना आदरांजली वाहताना पत्रकार संघाचे पदाधिकारी
------------------------------------------


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा