*सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात कमीत कमी एक तरी कोव्हीड सेंटर चालू करण्याची गरज : डॉ.विलास मेहता*
*सोलापुर प्रतिनिधी /बाळक्रुष्ण कापरे*[aj24taas ]
******************************
सोलापूर [प्रतिनिधी] :-- कोरोनाच्या महामारीने अख्या जगात थैमान घातले असून , मोठ-मोठ्या शहरा बरोबरच , ग्रामीण भागामध्ये या कोरोना ने फार मोठ्या प्रमाणात शिरकाव केलेला आहे .यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून प्रत्येक तालुक्यामध्ये किमान एक तरी कोव्हीड हेल्थ सेंटर उभा करण्याची गरज आज मोठ्या प्रमाणात भासत आहे. अशा प्रकारची मागणी कुर्डूवाडी चे व्यासपीठ , डॉक्टर. विलास मेहता .माजी नगरसेवक , सचिव - इंडियन मेडिकल असोसिएशन , सहसचिव - स्व. सौ. मीनाताई ठाकरे मेडिकल फाउंडेशन , व कुर्डूवाडी चे 1984 ते 2020 पर्यंत ज्येष्ठ शिवसैनिक. यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एका निवेदनाद्वारे केली आहे .
या निवेदनामध्ये त्यांनी असे म्हटले आहे की , नगरपालिके च्या सर्व क्षेत्र नंतर , गेल्या महिन्यात तालुका नागरी व ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव फार मोठ्या प्रमाणात वाढत चालला असून , ग्रामीण भागात कोव्हीड हेल्थ सेंटर व बेडची कमतरता फार मोठ्या प्रमाणावर भासत आहे . यासाठी शासकीय नागरी व ग्रामीण सेवेत अमुलाग्र बदल व सुधारणा करून कोव्हीड हेल्थ सेंटर (DCHC) व व बेडची उपलब्धता मोठ्या प्रमाणात करावी लागेल .सोलापूर जिल्ह्यामध्ये 2/3 उपजिल्हा रुग्णालये आहेत .माढा तालुक्यात 2/3 ग्रामीण रुग्णालय आहेत .व 10 प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. या सर्व आरोग्य व्यवस्थेचा विचार करून , व सर्व साधने विकसित करून , प्रत्येक तालुक्यात एक किंवा दोन कोव्हीड हेल्थ सेंटर उभा करणे नितांत गरजेचे आहे .उपजिल्हा रुग्णालयात सर्व सुविधा आहेत. तेथे 50 ते 100 बेडचे कोव्हीड हेल्थ सेंटर उभा करावेच लागेल. उपजिल्हा रुग्णालयात काही भाग नॉन कोव्हीड रुग्णांसाठी राखीव ठेवता येईल येईल. याशिवाय रुग्णालयाच्या मोकळ्या भूखंडामध्ये स्वतंत्र कोव्हीड सेंटर उभे करता येईल .नव्हे तर करावेच लागेल .अशी परिस्थिती सर्वच ठिकाणी आहे .ग्रामीण रुग्णालयाच्या इमारती कोव्हीड व नॉन कोव्हीड रुग्णालय करिता येण्यासारखे आहे.अन्यथा नजीकच्या काळात शासन, जि प बचत गट , संस्था , यांची इमारत अधिग्रहण करून ही व्यवस्था करावीच लागणार आहे. या ठिकाणी 30 ते 40 बेडची उपलब्धता होऊ शकेल. या शहरातील खाजगी फिजिशियन येथे सेवा देण्यास तयार आहेत. व जेथे होणार नाही तेथे आपत्ती कायद्याचा वापर करता येईल. शिवाय प्रत्येक फिजीशियन (एमडी मेडिसिन) नियुक्ती करण्यात यावी .या वाढीव कामासाठी तालुक्यातील दहा प्राथमिक आरोग्य केंद्रातील 50 टक्के वैद्यकीय अधिकारी व मेडिकल स्टाफ वर्ग करता येईल. मात्र या काळात कोणत्याही परिस्थितीत तरुणांच्या वाढत्या प्रादुर्भाव साठी एक तालुका कोव्हीड हेल्थ सेंटर होने फार गरजेचे आहे .नव्हे उभे करण्या शिवाय दुसरा पर्याय नाही.
या वरील सर्व गंभीर गोष्टीचा गांभीर्याने विचार करून सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये कमीत कमी एक तरी कोविड हेल्थ सेंटर सुरू करावे.अशी मागणी डॉ.मेहता यांनी केली आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा