Breaking

शुक्रवार, ७ ऑगस्ट, २०२०

*टेंभुर्णी जनता विद्यालयाचा शंभर टक्के निकाल*


*

*टेंभुर्णी जनता विद्यालयाचा शंभर टक्के निकाल*
------------------------------------------ 



टेंभुर्णी [प्रतिनिधी ] येथील जनता विद्यालयाचा १० वी चा सेमी इंग्रजीचा शंभर टक्के निकाल टक्के लागला व मराठी विभागाचा निकाल ९१.४० टक्के लागला असून या विद्यालयातील यशराज अर्जुन खटके याने ९०.४० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. तर श्वेता माधव गवळी हिने ९०.२० टक्के गुण मिळवीत द्वितीय क्रमांक पटकावला.
 पूजा लक्ष्मण बिराजदार व करण चंद्रकांत धोत्रे या दोघांनी  ८९.८० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला.  

यशस्वी विद्यार्थ्यांचे शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष औदुंबर महामुनी,सचिव विलास राजमाने,जनता विद्यालयाचे   मुख्याध्यापक प्रमोद भोसले,पर्यवेक्षक सादीक मोमीन व संतोष पाटील,      टेंभुर्णी प्रेस क्लब चे अध्यक्ष सोपान ढगे,दैनिक एकमत चे गणेश चौगुले , सतिश चांदगुडे , अनिल जगताप ,   वर्गशिक्षक विकास साठे, सविता जगताप,गणेश माढेकर व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा