शेतकर्यांची एफ. अार. पी. व कामगारांची थकीत रक्कम दिल्याशिवाय राज्यातील १ ही साखर कारखाना चालु देणार नाही. शंभूराज खलाटे प्रहार
Aj24taas news
इंदापूर प्रतिनिधी शिवाजी पवार
शेतकऱ्यांची एफ. अार. पी. ची पूर्ण रक्कम
दिल्याशिवाय गाळपास परवाना देण्यात येऊ नये. अन्यथा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने साखर आयुक्त कार्यालयावर तीव्र आंदोलन करणार असल्याची माहीती शंभूराज खलाटे प्रहार यांनी दिली
शेतकऱ्यांचे नेते प्रहार चे सर्वेसर्वा नामदार ओमप्रकाश उर्फ बच्चुभाऊ कडू यांच्या सुचने नुसार आज राज्याचे साखर आयुक्त श्री. शेखर गायकवाड साहेब यांना प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात आले महाराष्ट्रातील ज्या कारखानदारांनी शेतकऱ्यांची रक्कम अजूनही पूर्ण केलेली नाही तसेच कामगारांचे थकीत देणी दिले नाहीत. मागील गळीत हंगामाच्या अगोदरचे पैसे कारखान्यांकडून येणे आहे अशा कोणत्याही साखर कारखान्यास आपण येणाऱ्या गळीत हंगामामध्ये गाळपाची परवानगी देऊ नये अशा आशयाचे निवेदन प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने राज्य प्रवक्ते शंभूराज खलाटे यांच्या उपस्थितीत देण्यात आले.
यावेळी सांगलीचे जिल्हाप्रमुख स्वप्नील पाटील सातारचे अपंग क्रांती जिल्हाप्रमुख अमोल कारंडे फलटण तालुका प्रमुख सागर गावडे शिराळा तालुकाप्रमुख बंटी नांगरे पाटील सोलापूरचे किरण भांगे यांच्यासह सातारा,सांगली,सोलापुर,कोल्हापुर व पुणे येथील शेतकरीपुत्र उपस्थित होते यावेळी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की शेतकऱ्यांची थकबाकी एफ. आर. पी. ची रक्कम पूर्ण केल्याशिवाय कोणत्याही साखर कारखान्यास गाळप परवाना कसल्याही परस्थितीत देण्यात येणार नाही. गायकवाड साहेबांच्या कारकिर्दीमध्ये राज्यातील बऱ्याच साखर कारखान्यावर आर. आर. सी. ची कारवाई करण्यात आली. या गळीत हंगामाच्या पूर्वी राज्यातील सर्व शेतकऱ्यांचे पैसे व कामगारांची देणी कारखानदार देतील. अशी आशा आयुक्त साहेबांनी मांडलेल्या भूमीकेमुळे वाटत अाहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा