*पदवीधर संघटना महाराष्ट्र राज्य माढा तालुका अध्यक्षपदी महेशकुमार आवारे*
------------------------------------------
टेंभुर्णी [प्रतिनिधी ] महाराष्ट्र पदवीधर संघटनेची संघटनात्मक बांधणी करण्यासाठी व त्यांची विचारधारा जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पदवीधर संघटना महाराष्ट्र राज्य माढा तालुका अध्यक्षपदी महेशकुमार बाळासाहेब आवारे यांची निवड नुकतीच यशोदिप कम्प्युटर्स टेंभुर्णी येथे घेण्यातआलेल्या बैठकीत करण्यात आली पदवीधर संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्रभर अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात त्याद्वारे सामाजिक प्रबोधन, युवकांचा सक्रिय राजकारणात सहभाग यासाठी संघटना सातत्याने काम करत आहे. पदवीधर संघटना महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष सुजित थेटे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन निवड करण्यात आली. यशोदीप कम्प्युटर्सचे संस्थापक गोरख खटके सर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडला.
यावेळी युवा नेते जयदीप साठे,हरिभाऊ माने, बाळासाहेब आवारे, संजय सलगर, अमोल पाटील, प्रवीण गायकवाड, रमेश लवटे, गणेश गायकवाड,राजेंद्र दडस आदी उपस्थित होते.
पदवीधर संघटना महाराष्ट्र राज्य माढा तालुकाध्यक्षपदी महेशकुमार आवारे यांची निवड झाल्याने युवक नेते जि.प सदस्य रणजीत भैया शिंदे, जि. प.सदस्य सौ अंजनादेवी शिवाजीराव पाटील, जिल्हा दूध संघाचे संचालक .शिवाजीराव पाटील, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ अालेगाव खुर्द आदींनी अभिनंदन केले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा