*माढा तालुक्यात आरोग्य खात्याच्या दक्षतेने कोरोनो साखळी तोडण्यास प्रभावी अंमलबजावणी...*
कुर्डुवाडी विशेष बुलेटिन aj24taas news
*अरुण कोरे(पत्रकार)यांजकडून...*
*कुर्डुवाडी शहरात आज सलग दुसऱ्या दिवशी एकही कोरोनो पाॅझीटीव्ह रुग्ण आढळून आला नसल्याने नागरिकांत समाधान व्यक्त केले जात आहे.*
*कुर्डुवाडी शहरासह माढा तालुक्यात आरोग्य खात्याच्या वतीने गेल्या आठवड्याभरापासून रॅपीड अॅन्टीजेन टेस्टचा धडाका लावण्यात आल्याने बाधीत रुग्णांची साखळी तोडण्यासाठी चांगलीच मदत मिळत आहे.*
*सोमवारी तालुक्यात एकूण १२१ नागरिकांची टेस्ट करण्यात आली.त्यातील दोनसह एकूण सहा जणांचे रिपोर्ट पाॅझीटीव्ह रुग्ण आढळून आले.*
*कुर्डू २, माढा २, मोडनिंब व म्हैसगाव येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळले आहेत.*
*कुर्डुवाडी ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.संतोष अडगळे व त्यांच्या पथकाने व न.पा.आरोग्य निरिक्षक तुकाराम पायगण यांनी गेल्या आठवड्याभरात कुर्डुवाडी शहरात केलेल्या उपाययोजनांमुळे कोरोनो साखळी तोडण्यासाठी चांगलीच मदत मिळत आहे.*
*तसेच माढा तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.अमोल माने,सुपरवायझर संतोष पोतदार व त्यांच्या सहकाऱ्यांनी तालुक्यात प्रभावी उपाययोजना करण्यास सुरुवात केल्याने कोरोनो साखळी तोडण्यासाठी चांगलीच मदत मिळत आहे.*
*मोडनिंब,कुर्डू, माढा लवूळ,उपळाई येथे वाढत्या रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट झाल्याचे आजतरी दिसत आहे.*
*रॅपिड अॅन्टीजेन टेस्ट मध्ये मोठ्या प्रमाणात रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने आरोग्य खात्याचा भारही हलका झाला आहे.*
*खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांनी व नागरिकांनी अतिदक्षता घेऊन नियमांचे पालन कटाक्षाने केले तर कोरोनो साखळी यथावकाश तोडण्यास मदत मिळणार असल्याने सर्वांनीच त्याची अंमलबजावणी करावीच असे आवाहन करण्यात येत आहे.*
*******
------------------------------------------
उजनी धरण आजची पातळी
दि :10/08/20
संध्या 6.00वा
पाणी पातळी : 492.900
एकूण साठा : 2205.74
उपयुक्त साठा : 402.93
टक्केवारी : 26.56 %
बंडगार्डन विसर्ग :
दौंड विसर्ग : 5046
कालवा :
बोगदा :
नदी :
वीज निर्मिती :
पाऊस : मी.मी.
एकूणः 444मी.मी.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा