*सुप्रसिद्ध संपादक महेश म्हात्रे यांना आचार्य अत्रे पुरस्कार*
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने दिला जाणारा "आचार्य अत्रे स्मृती संपादक पुरस्कार" महाराष्ट्र रिसर्च सेंटर चे संचालक- संपादक महेश म्हात्रे, ( मूळ निवासी, वाडा, जिल्हा पालघर) यांना आज राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हस्ते, डॉ नरेंद्र जाधव, सिने अभिनेते भारत जाधव, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, मराठी पत्रकार परिषदेचे आधारस्तंभ एस एम देशमुख आणि असंख्य पत्रकार आणि हितचिंतक यांच्या उपस्थितीत प्राप्त झाला...
गेल्या दोन दशकात मराठी पत्रकारीतेला नवीन दिशा देणारा आणि सतत नाविन्याचा शोध घेणारा तरुण संपादक अशी महेश म्हात्रे यांची ओळख आहे. महेश म्हात्रे हे एक बहुआयामी संपादक असून ते प्रिंट, इलेक्ट्रॉनिक व वेब मीडियामध्ये, तसेच हिंदी आणि इंग्रजी माध्यमातही सहज आणि उत्तमपणे काम करू शकतात हे नजिकच्या काळातील त्यांच्या कामगिरीतून सिद्ध झाले आहे. महेश म्हात्रे यांनी आजवर संपादक म्हणून तरुण भारत मुंबई, तरुण भारत , नागपूर, सकाळ, नागपूर, लोकमत, मुंबई, वरिष्ठ संपादक इंडियन एक्सप्रेस, प्रहार, न्यूज 18 लोकमत अशा महत्त्वाच्या वृत्तसंस्था मध्ये *संपादक* म्हणून काम केले आहे. सध्या ते *महाराष्ट्रातील सांस्कृतिक,सामाजिक परंपरांचे अभ्यासक आणि राजकीय विश्लेषक* म्हणून "महाराष्ट्र रिसर्च सेंटर" मध्ये संचालक म्हणून कार्यरत आहेत. पत्रकारीतेच्या क्षेत्रात महेश म्हात्रे यांनी अनेक अतिशय मानाचे पुरस्कार मिळवले आहेत. जागतिक संपादक परिषद, विश्व वृत्त संघ अशा महत्त्वाच्या संघटनांशी ते संलग्न आहेत. अमेरिकेन अध्यक्षपद निवडणुकीच्या प्रत्यक्ष अनुभवापासून दक्षिण कोरिया आणि इस्रायलच्या उच्च सदस्यीय शिष्टमंडळातील समावेशासह अनेक बहुमान त्यांना लाभले आहेत. जगभर नावाजलेली 'टेड' (TEDx) व्याख्यानमालेत भाषण करण्याची संधी लाभलेले ते एकमेव मराठी संपादक आहेत. " मनमोगरा" हा त्यांचा ललित लेख संग्रह प्रकाशित झालेला आहे.
महेश म्हात्रे यांचे शालेय शिक्षण वाडा येथील स्वामी विवेकानंद विद्या मंदिर आणि पी जे हायस्कूल येथे झाले आहे.
*_अतुल रोडगे / प्रतिनिधी तेजःपुंज न्युज मिडिया


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा