Breaking

बुधवार, २ जुलै, २०२५

पिलीव येथील‌ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करांडेवस्ती येथे ताबडतोब शिक्षक नेमणयाची गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी.


पिलीव येथील‌ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करांडेवस्ती येथे ताबडतोब शिक्षक नेमणयाची गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी.        

               पिलीव प्रतिनिधी प्रमोद भैस- 
माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करांडेवस्ती ही पहीली ते चौथीपर्यंत वर्ग असणारी शाळा आहे. मात्र याठिकाणी नियमानुसार दोन शिक्षकांची नियुक्ती आहे परंतु याठिकाणी असणाऱ्या एका शिक्षकाची मुख्याध्यापक पदी पदोन्नती झाल्यामुळे सध्या एकच शिक्षक आहेत. याठिकाणी जवळपास ३७ विदयार्थी शिक्षण घेत असुन चार वर्गाला एकच शिक्षक असल्याने विदयार्थचे प्रचंड मोठे शैक्षणीक नुकसान होत आहे. याठिकाणी ताबडतोब दुसऱ्या शिक्षकाची नियुक्ती करणयाची मागणी शाळा व्यवस्थापन समीतीचे अध्यक्ष प्रमोद भैस, उपाध्यक्ष सतिश करांडे, सदस्य हणमंत भिसन, सागर भैस ,शरद मदने व पालक राजेंद्र बगाडे, दादा मदने व इतरांनी माळशिरस पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व‌ गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.           चौकट  - पिलीव बिटच्या विस्तार अधिकारी महामुनी मॅडम यांनी याठिकाणी ताबडतोब शिक्षक देणयाचे आश्वासन त्यांनी दिले.          फोटो - गटशिक्षणाधिकारी नकाते मॅडम यांना निवेदन देताना शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रमोद भैस ,उपाध्यक्ष व इतर सदस्य.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा